.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील बो’ल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेली मलायका अरोरा आजकाल तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूकबद्दल खूप चर्चेत असते. तिच्या फिटनेसची चर्चा प्रत्येक घरात होत राहते. पण तिचा बोल्ड लूक सोशल मीडियावर अधिकच पाहायला मिळतो. मलायका एखाद्या तरुण अभिनेत्रीलाही फिकी पाडेल अशी सुंदर दिसते.
मलयकाची स्टाइल खूपच बो’ल्ड आणि ग्लॅमरस आहे. म्हणूनच की काय तिचा भला मोठा चाहतावर्ग आहे. मलायका अरोरा इतकी फॅशनेबल आहे की ती तिच्या जिम लूकपासून ते पार्टी लूकपर्यंत दाखवते. नुकतीच मलायका अरोरा मुंबईतील वांद्रे येथे स्पॉट झाली होती. जिथे ती फक्त शर्टमध्ये दिसली होती.
पँटशिवाय सैल शर्ट घालून घराबाहेर पडलेल्या मलायकाची ही स्टाईल ज्या कोणी पाहिली, तो थक्क झाला. हा लूकही मलायकाने शानदार स्टाईलमध्ये कॅरी केला होता. मलायका अरोराने पांढरा प्रिंटेड शर्ट घातला होता. ज्यामध्ये तिने काळे बूट घातले होते आणि एक मोठी पर्स घेतली होती. मलायका डिनर डेटसाठी तयार दिसत होती.
मात्र, अभिनेत्रीची ही स्टाईल अनेकांना आवडली नाही. त्याचवेळी यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. युजर्स म्हणाले की, “अर्जुनचा शर्ट घालून आली की काय.” तर दुसरा म्हणाला, “हे लोक बाहेर जाताना फक्त शर्ट घालतात का?” ट्रोलर्सच्या कमेंट येत असल्या तरी देखील मलायका तिच्या लूकवर प्रयोग करत असते.
सोशल मीडियावर लोक तिच्याबद्दल जे काही बोलतात ते नकारात्मक असले तरी तिला काही फरक पडत नाही, असे तिने अनेकदा म्हटले आहे. मलायका या किलर लूकमध्ये दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. मलायकाला नुसत्या शर्टसोबत स्टाईल कशी करायची हे माहित आहे.
याआधीही ती या अनोख्या फॅशन स्टाईलमध्ये दिसली आहे आणि प्रत्येक वेळी प्रमाणेच या वेळीही तिच्या चाहत्यांना तिची जबदस्त स्टाईल आवडली आहे. मलायकाला फॅशनमध्ये प्रयोग करायला आवडते आणि ती एकही संधी हातातून जाऊ देत नाही. पार्टीत सुंदरी कोणीही असली तरी, मलायकाला कॅमेरे तिच्याकडे कसे वळवायचे हे माहित आहे.
2017 मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन मलायकावर खूप प्रेम करतो आणि तिची खूप काळजी घेतो. या दोघांमधील प्रेम खूप सुंदर आहे. मलायका अरोरा पडद्यापासून दूर असून देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती एक प्रतिभावान अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने अनेक आयटम साँगमध्ये काम करून आपला जबरदस्त जलवा दाखवला आहे.