.
अमृता सिंग आणि सैफ अली खान ही अशी दोन नावे आहेत जी विभक्त होऊनही एकमेकांपासून कधीच विभक्त होणार नाहीत. जोपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीतील जोड्यांचा उल्लेख असेल तोपर्यंत अमृता आणि सैफचे नावही चर्चेत येईल.
पहिल्याच भेटीत डोळ्यांचा मिलाप ते दुसऱ्या भेटीत एकमेकांना हृदय देण्यापर्यंत प्रत्येक वळणावर त्यांचे नाते खास राहिले आहे. विशेषतः त्यांची दुसरी भेट ज्यामध्ये त्यांचे प्रेम सुरू झाले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर त्यांच्या प्रेमाला पहिल्या भेटीपासूनच सुरुवात झाली होती.
पहिल्याच भेटीत बोलावले होते जेवायला :- एका चित्रपटाच्या फोटोशूटदरम्यान अमृता आणि सैफची भेट झाली आणि त्यानंतर सैफ तिच्या प्रेमात पडला. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत देखील त्याला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही. तेव्हा त्याने अमृताला फोन करून जेवायला आमंत्रण दिले होते. कुठेतरी अमृताही सैफकडे आकर्षित झाली होती.
त्यामुळे तिने बाहेर जेवायला जाण्याऐवजी सैफला तिच्या घरीच जेवायला बोलावले होते. एका मुलाखतीत सैफ आणि अमृता दोघांनीही त्या भेटीबद्दल सांगितले होते आणि सांगितले होते की, फक्त डिनरसाठी आलेला सैफ 2 दिवस तीच्या घरी कसा राहिला. त्याच वेळी, दोघांमध्ये पहिले चुंबन देखील झाले होते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
अवघ्या ६ महिन्यात लग्न झालं :- दोन दिवस राहिल्यानंतर जेव्हा त्याला चित्रपटाच्या सेटवरून फोन येऊ लागले तेव्हा सैफ शूटिंगला जायला तयार झाला पण त्यावेळी त्याच्याकडे पैसे नव्हते आणि त्याने अमृताकडून 100 रुपये उसने मागितले. असे म्हटले जाते की या भेटीनंतर 6 महिन्यांत सैफ आणि अमृताने गुपचूप लग्न केले होते, जे दोघांच्या घरच्यांनाही माहीत नव्हते.