.
आयुर्वेदात नारळ खूपच शुभ मानले गेलेले आहे. नारळात मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात की जे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात लाभदायक पोषक तत्व पुरवीत असतात. नारळ बाजारात किंवा किराणा दुकानात आपल्याला सहज उपलब्ध होतात. तसेच बाजारात नारळापासून तयार केलेले अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ बघायला मिळतील. आणि याचा उपयोग करून आपण आपले जीवन समृद्ध बनवू शकतो.
आज आपण या लेखाद्वारे नारळाबद्दल अशी काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत की ज्यामुळे तुमचे जीवनच खूपच बदलून जाईल. चला तर मग जाणून घेऊयात ओले नारळ खाल्याने शरीरावर काय परिणाम होतात किंवा याचे शरीराला काय फायदे होतात. विशेषतः नारळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ जीवनसत्व आढळून येते. नारळात असणारे हे जीवनसत्व प्रत्येकाच्या शरीरासाठी खूपच लाभदायक ठरते.
प्रत्येकाच्या घरात लहान मुल असतातच आणि त्यांना घरात बनवलेल्या पदार्थां पेक्षा बाहेरील पदार्थ खाण्याची मोठी आवड असते. यामध्ये चॉकलेट, तळलेले पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. जर लहान मुलांनी बाहेरील गोड पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले तर मुलांच्या पोटामध्ये जंत होण्याची दाट श्यक्यता असते.
यावर उपाय म्हणून जर तुम्ही लहान मुलांना नियमितपणे ओले खोबरे खायला दिले तर त्यांच्या पोटात तयार झालेले जंत नष्ट होण्यास जास्त मदत होते. त्याच प्रमाणे लहान मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच जर कुणाची नजर कमजोर झाली असेल किंवा डोळ्यांना स्पष्टपणे कोणतीही वस्तू दिसत नसेल, तसेच डोळ्यापुढे नेहमी अंधार येत असेल तर यावेळी आपण खोबरे आणि गूळ एकत्र करून याचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे.
तसेच बऱ्याच व्यक्तींना मुळव्याध हा आजार उद्भवत असतो. यासाठी आपण वेगवेगळे उपचार घेऊन मुळव्याध दूर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु बऱ्याच जणांना हे ही माहिती नाही की मुळव्याधवर नारळ हे अत्यंत गुणकारी औषध म्हणून उपयोग करू शकतो. यावरील उपायांसाठी नारळाचे जे कोंब असतात त्यांची राख करा. ही बनवलेली राखेची पावडर १०० ग्रॅम पिठी साखरे मध्ये मिसळा आणि याचे सेवन सलग आठ दिवस नियमितपणे करा.
असे केल्याने मूळव्याध तसेच भगंदर पूर्णपणे बरा होतो. यासोबतच शौचालय द्वारे रक्त पडणे या समस्यां देखील दूर होतात. कुणाला जर मुतखडा असेल तर तो बाहेर काढण्यासाठी नारळाच्या पाण्याचा उपयोग देखील लाभदायक ठरू शकतो. नारळाच्या पाण्यामध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याची ताकत असते.
जर तुम्ही नियमितपणे नारळ पाणी पित राहिलात तर शरीरामध्ये जे विषारी घटक व मू’त्रा’शय मध्ये जे खडे निर्माण झालेले असतात ते खडे बाहेर पडण्यासाठी नारळाचे पाणी खूपच लाभदायक ठरते.
जर कुणी महिला ग’रोदर असेल तर अशा वेळी अनेक लोकांकडून नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी नारळ पाणी पिल्याने ग’र्भवती महिलेला अधिक ऊर्जा तर मिळतेच पण त्याबरोबरच त्या महिलेच्या गर्भाशयातील बाळ देखील तंदुरुस्त रहाण्यास मदत होते. असे म्हणतात की जर महिलेने ग’र्भावस्थेत नियमितपणे ओले खोबरे अथवा नारळ पाणी पिल्याने बाळ गोरे रंगाचे होते.
बऱ्याच जणांना अनेक प्रकारचे त्वचा विकार असतात. यावेळी हे त्वचा विकार दूर करण्यासाठी नारळाचे तेल व त्यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबूचे रस आपण टाकले आणि या तेलाने आपण मालिश केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार असेल तर तो नाहीसा होऊ शकतो.