पाकिस्तानच्या ‘या’ अभिनेत्रीचे विचित्र ‘वक्तव्य’, म्हणाली झिम्बाब्वेने पुढील सामन्यात भारताला हरवल्यास ‘मी’ झिम्बाब्वेच्या एका ‘तरुण’ मुलासोबत…

बॉलिवूड

.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उपांत्य फेरी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय संघ सुपर-12 मध्ये आतापर्यंत पाच सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने दक्षिण आफ्रिका वगळता पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेशचा पराभव केला आहे.

भारताचा पुढील सामना झिम्बाब्वेशी होणार असून यासोबतच उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणत्या संघासोबत होणार हेही ठरणार आहे. पण या सामन्याबद्दल पाकिस्तानी अभिनेत्री सहार शिनवारीने एक ट्विट केले आहे ज्याची मीडियावर जोरदार चर्चेत आले आहे.

अभिनेत्री शिनवारी सहारने एक विचित्र ट्विट केले आहे :- पाकिस्तानी अभिनेत्री शिनवारी सहारने आता सोशल मीडियावर भारत-झिम्बाब्वे (India vs Zim) सामन्याबद्दल ट्विट केले आहे. ज्याची खूप चर्चा होत आहे. सहारने ट्विट करून लिहिले की,

जर झिम्बाब्वे संघाने करिष्मा दाखवला आणि पुढच्या सामन्यात भारताला हरवले तर मी झिम्बाब्वेतील कोणाशी तरी मी लग्न करेन. सहार शिनवारीचे हे ट्विट सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होत आहे. आज, गुरुवारी सकाळीच तीने हे ट्विट केले आहे.

बांगलादेश सामन्यातही विचित्र ट्विट :- पाकिस्तानी अभिनेत्री सहार अनेकदा तिच्या संतापजनक ट्विटमुळे चर्चेत असते, अशी माहिती मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ती सतत प्रार्थना करत होती की या सामन्यात भारत हरेल. या सामन्यात एवढा पाऊस पडावा, की उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशाही धुऊन निघाव्या, अशी ती प्रार्थना करत होती.

मात्र तीच्या सर्व प्रार्थना फलद्रूप झाल्या नाहीत आणि भारताने जबरदस्त सामन्यात बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला. बांगलादेशच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता काही करिष्माच पाकिस्तानला उपांत्य फेरीपर्यंत नेऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.