पहिल्याच भेटीत ‘कियारा’ अडवाणी ‘सिद्धार्थला’ सर्व काही देऊन बसली होती, पहा खूपच ‘रोमँटिक’ आहे दोघांची लव्हस्टोरी…

बॉलिवूड

.

बॉलिवूड कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकले आहेत. हे कपल त्यांच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. शेरशाह या चित्रपटातही दोघे एकत्र दिसले होते. शेरशाहच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली असे अनेकांचे मत आहे, पण तसे नाही. लग्नाआधीच्या त्यांच्या प्रेमकथेवर एक नजर टाकूयात…

सिद्धार्थ कियारा पहिल्यांदा लस्ट स्टोरी चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीमध्ये भेटले होते. दोघेही पार्टीत भेटले, बोलले आणि दोघांनी पार्टी क्रॅश केली. म्हणजेच दोघेही पार्टी सोडून एकमेकांसोबत निघून गेले.

चर्चा सुरू झाली आणि त्याच दरम्यान करण जोहरने दोघांनाही शेरशाह चित्रपटात एकत्र कास्ट केले. शूटिंगच्या संदर्भात दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि दोघेही कधी डिनर डेटवर तर कधी सुट्टीवर एकत्र स्पॉट झाले. 2019 मध्ये नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दोघेही एकत्र दक्षिण आफ्रिकेत गेले होते.

नातं गुपित ठेवत दोघांनीही एकत्र फोटो पोस्ट केले नाहीत, पण अशाच पार्श्वभूमीमुळे त्यांच्या नात्याला हवा मिळत गेली. रिलेशनशिपमध्ये फक्त दीड वर्ष उलटले होते की 2021 मध्ये सिद्धार्थने कियाराची त्याच्या पालकांशी ओळख करून दिली. एकमेकांचे पालकही भेटले. त्याचवेळी करण जोहरने दोघांमधील नात्याचा खुलासा केला.

यानंतर अक्षय कुमार देखील लक्ष्मी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सिद्धार्थच्या नावाने कियाराला चिडवताना दिसला. दोघेही एकत्र स्पॉट झाल्यानंतर तर कधी चॅट शोमध्ये एकमेकांचा उल्लेख केल्याने चर्चेत राहिले.

कियाराच्या आधी सिद्धार्थने आलिया भट्टला डेट केले होते. विशेष म्हणजे कियाराचे खरे नाव देखील आलिया आहे. कियाराचा नंबर सिद्धार्थच्या मोबाईलमध्ये स्पीड डायलवर आहे जिथे तिचे नाव तिच्या नावानेच सेव्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.