बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीच्या नृत्य आणि अभिनय शैलीबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच. लाखो लोक तिच्या सौंदर्याचे वेडे आहेत, परंतु आता असे दिसत आहे की, आणखी नोरा फतेही जन्माला येत आहेत.
अश्याच एका लहान मुलीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात ती नोराच्या प्रसिद्ध “छोड देंगे”या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तो मुलगी तिच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये नोराची हुबेहूब कॉपी करत आहे.
व्हिडिओ क्लिपमध्ये, मुलगी २०२१ मधील “छोड देंगे” या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिने अभिनेत्रीसारखाच लाल लांब घागरा आणि क्रॉप टॉप परिधान केलेला आहे आणि सारख्याच दागिन्यांसह तिचा लुक पूर्ण केला आहे. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॅकग्राऊंडला टीव्हीवर नोराचे ओरिजनल गणे लावले आहे व टीव्हीच्या समोर ती तसाच हुबेहूब डान्स करत आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर “तानिया आणि सोनी” नावाच्या एका पेजने शेअर केला आहे. आतापर्यंत ६ दशलक्षाहून अधिक लोकांनी या मुलीचा डान्स पाहिला आहे. ४० हजारांहून अधिक लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे आणि ३ हजार लोकांनी टिप्पणी म्हणजेच कमेंट विभागात आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काही वापरकर्ते तिच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत तर काही तिच्या नृत्याची प्रशंसा करत आहेत. एकाने टिप्पणी केली की – “सुंदर”.तर दुसरा म्हणाला- “तू खूप गोड डान्स करत आहेस”. त्याचवेळी एकाने तिला “छोटी नोरा” म्हटले. खूप जणं सोशल मीडियावर मुलीचे कौतुक करत आहे. नोरा फतेही यांचे “छोर देंगे” हे गाणे ४ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेला आहे.
बघा विडिओ :–