नोरा फतेहीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली सुकेशने या विचित्र ‘अटीवर’ मोठे घर आणि लग्जरीअस लाईफ देण्याचा केला होता वादा…

बॉलिवूड

.

ठग सुकेश चंद्रशेखरने 215 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नोरा फतेही यांचे वक्तव्य आता समोर आले आहे. पटियाला हाऊस कोर्टात दिलेल्या निवेदनानुसार, सुकेशने नोराला मोठे घर आणि आलिशान जीवनशैलीचे वचन दिले होते जर तीने त्याची एक विचित्र अट मान्य केली तर.

नोरा फतेहीने ठग सुकेश चंद्रशेखर याच्या 215 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आपला जबाब नोंदवला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये नोराने म्हटले आहे की, सुकेश चंद्रशेखरसोबत राहण्यासाठी अनेक अभिनेत्री मरायच्या. निवेदनानुसार, सुकेश तिला लक्झरी लाइफचे आश्वासन देत होता.

नोराशिवाय जॅकलीन फर्नांडिस, निक्की तांबोळी, चाहत खन्ना या अभिनेत्रींचीही नावे मनी लाँड्रिंग प्रकरणात जोडली गेली आहेत. पिंकी इराणीचे नाव समोर आले. जॅकलिनशिवाय आता नोराने सुकेशवर खोटे बोलल्याचा आरोपही केला आहे. यासोबतच नोराने सुकेशची सहकारी पिंकी इराणी हिचेही नाव या प्रकरणात घेतले आहे.

ती म्हणाली, ‘सुकेशने त्याची सहकारी पिंकी इराणी यांच्यामार्फत तिच्याकडे मागणी केली होती की, जर ती (नोरा) त्याची गर्लफ्रेंड होण्यास तयार असेल तर तो (सुकेश) तिला मोठे घर आणि आलिशान जीवनशैली देईल.’ ‘मी सुकेशला कधीच भेटली नाही’ – नोराने परखड मत नोंदविले.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, नोरा फतेहीने कोर्टात दिलेल्या जबाबात सांगितले की, ‘पिंकी इराणीने मला सांगितले होते की सुकेशसोबत राहण्यासाठी अनेक मुली मरतील पण तू खास आहे त्याच्यासाठी. सुरुवातीला मला सुकेश कोण हे माहीत नव्हते. नंतर मला वाटले की तो LS Corporation नावाच्या कंपनीत काम करायचा.

सुकेशशी माझा कोणताही वैयक्तिक संपर्क नव्हता किंवा मी त्याच्याशी कधीही संवाद साधला नाही. मलाही याची कल्पनाही नाही. ईडीने मला त्यांच्या कार्यालयात दोघांना समोरासमोर उभे केले तेव्हाच मी त्याला (sukesh chandrashekhar) प्रथमच पाहिले. नोरा फतेही या खटल्यात साक्षीदार आहे.

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर राहून खंडणीच्या प्रकरणात तिचा जबाब नोंदवल्यानंतर काही दिवसांनी नोरा फतेहीचे नुकतेच वक्तव्य आले आहे. यापूर्वी नोराचे वक्तव्य पुरावे म्हणून सादर केले जात होते. आता वृत्तानुसार, नोराला या खटल्यात साक्षीदार मानले जात आहे.

नोराने तिच्या वक्तव्यात असेही म्हटले आहे की, ‘जेव्हा तिला ईडीने 215 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी तिच्या कार्यालयात बोलावले होते, तेव्हा तिला कळले की सुकेश हा फसवणूक करणारा आहे.’ नोरा पुढे म्हणाली, ‘सुकेशच्या प्रकरणात ती पीडित होती आणि कोणत्याही प्रकारे मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी नव्हती.’

ईडीने नोरावर सुकेशकडून कार, हिरे आणि डिझायनर बॅगसह अनेक भेटवस्तू घेतल्याचा आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.