.
महा ठग सुकेश चंद्रशेखरबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. याप्रकरणी सुकेशसोबतच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचीही सतत चौकशी केली जात आहे. आता नुकतेच सुकेशने त्याच्या वकिलांमार्फत एक पत्र लिहिले आहे. या पत्रात सुकेशने नोरा फतेही आणि जॅकलिन मधील वादाबाबत अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत.
सुकेशने पत्राद्वारे खुलासा केला आहे की नोराची इच्छा होती की त्याने जॅकलिनची साथ सोडावी. नोरा सुकेशला दिवसातून दहा वेळा फोन करायची आणि त्याने नकार देऊनही त्याचा सतत छळ करत होती. सुकेशने असाही दावा केला आहे की नोराने इकॉनॉमिक ऑफेन्स ब्युरो (ईओडब्ल्यू) समोर आपले म्हणणे बदलले होते.
सुकेश चंद्रशेखर यांनी नोरा फतेहीवर आरोप केला
सुकेश चंद्रशेखर यांनी आपल्या पत्रात लिहिले की, ‘माझे आणि जॅकलिनचे चांगले संबंध होते. याच कारणामुळे नोरा फतेही जॅकलीनचा नेहमी हेवा करत असे आणि ती मला जॅकलिनच्या विरोधात भडकवायची.
कारण तिची इच्छा होती की मी जॅकलीनला सोडून तिला डेट करायला सुरुवात करावी. नोरा दिवसातून कमीत कमी 10 वेळा मला कॉल करायची आणि जर मी तिच्या कॉलला उत्तर दिले नाही तर ती मला सतत कॉल करायची. आणि माझ्यावर फोन करण्यासाठी दबाव टाकायची.
सुकेशने नोराला दिल्या खूपच महागड्या वस्तू :- सुकेशने नोरा फतेहीचे जॅकलिनवर लावलेले सर्व आरोप बनावट असल्याचे म्हटले आहे. यासह सुकेशने नोरावर आरोप केला आहे की तिने ईडी आणि ईओडब्ल्यूसमोर वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत. नोरानेही खोटे बोलले आहे की तिला माझ्याकडून कार घ्यायची नव्हती. हे सर्वात मोठे खोटे आहे.
कारण जेव्हा ती मला भेटलो तेव्हा तिच्याकडे एक साधी कार होती आणि ती तिची कार बदलण्यासाठी माझ्या मागे लागली होती. म्हणूनच मी तीला BMW S सिरीज भेट दिली. याशिवाय ती पर्स आणि दागिन्यांचे फोटो पाठवत असे, जे तिला हवे होते आणि मी तिला गिफ्टही केले होते. मी तिला दिलेल्या एका बॅगची किंमत 2 कोटींहून अधिक आहे.