.
सर्वांना हे माहीतच आहेत की भारतील जंगलात तब्बल 70 वर्ष एकही चित्ता नव्हता. आता 70 वर्षानंतर भारतात पुन्हा चित्ते आणले गेले आहेत. भारतात हे चित्ते नामिबिया येथून आणले असून चित्त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकं खूप उत्सुक झाले आहेत. या चित्त्यांची एक झलक बघायला मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. भारत देशात चित्त्यांची संख्या पुन्हा एकदा वाढावी म्हणून प्रयत्न चालू असतानाच याला यश मिळताना दिसू लागले आहे.
नामिबियातून एकूण 8 चित्ते आणले असून त्यापैकी 3 मादी तर 5 नर चित्ते आहेत. यापैकी ‘आशा’ नावाचा एक मादी चित्ता गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या गोड बातमीने आता भारतातील चित्त्यांची संख्या वाढेल यात शंकाच नाही. हे 8 चित्ते मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडलेले असून त्यापैकी आशा मादी चित्ता ग’र्भवती असल्याची माहिती समोर आली आहे.
परंतु अजून तरी याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा दिला नाहीये. कुनो नॅशनल पार्कमधील (Kuno National Park) वन अधिकारी या मादी चित्त्यावर चांगलेच लक्ष ठेऊन आहे. परंतु जर ही बातमी खरी निघाली तर भारतासाठी हे एक खास गिफ्ट ठरू शकेल’. आशा नावाची चित्ता मादी आता जंगलातून बाहेर आली आहे. यावरून ती गर्भवती असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जर ही बातमी खरी ठरली तर भारतातील चित्ता प्रोजेक्टसाठी ही एक महत्त्वपूर्ण घटना समजली जाणार आहे. या गर्भवती मादी चित्ता आशा तणावमुक्त रहाण्यासाठी रिकाम्या जागेची व शांततेची नितांत गरज आहे. जेणेकरुन ती तिच्या होणाऱ्या पिल्लांचे पालन-पोषणावर व्यवस्तीत करू शकेल.
आशानं जर पिल्लांना जन्म दिला तर नामिबियातून आलेल्या आठ चित्त्यांनंतर हे भारतासाठी खास गिफ्ट ठरू शकेल, असं चित्ता संवर्धन फंडचे कार्यकारी अधिकारी लॉरी मार्कर यांनी कथित केले आहे. आता सर्वांचे लक्ष या मादी चित्याकडे वेधले गेले आहेत आणि सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ही बातमी ऐकून प्रनिमित्रांमध्ये देखील उत्साह वाढलेला दिसून येत आहे.
खात्री पटण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणारसध्या मादी चित्ताच्या व्यवहारात बदल दिसत असून शारिरीक आणि हार्मोनल बदल ‘आशा’ गर्भवती असल्याचं संकेत देत आहेत. ही बातमी उत्साहीत करणारी असली तरी आशा चित्ता गर्भवती असल्याची खात्री पटण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 17 सप्टेंबरला हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात 8 चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर या चित्त्यांच्या प्रकृतीवर आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होतं.