दोन चिमुरड्यानी चोरपासून वाचवले आपल्या आईचे दागिने , कसे ते बघा इथे

जरा हटके

। नमस्कार ।

१२ वर्षांचा भूषण आणि १० वर्षांचा लहान भाऊ सानिध्य या दोन चिमुरड्या मुलांनी एका चोराचा तब्बल ३ किलोमीटर पाठलाग करत आपल्या आईचे चोरी गेलेले दानिगे परत मिळवले आहेत. या दोन चिमुरड्यांच्या हिम्मतीचे आसपासच्या परिसरात कौतुक केलं जात आहे.

आई आणि वडील बाजारात गेले असता, एका चोरट्याने संधी साधून घरातील दागिन्यांवर डल्ला मारला. पण छतावर खेळणाऱ्या दोन चिमुरड्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आईचे दागिने परत मिळाले आहेत. आई-वडील बाजारातून घरी आल्यानंतर ही घटना त्यांच्या कानी पडली.

नागपूरामधील गिट्टीखदान परिसरातील रहिवासी असणारे सुरेश जिवतोडे शनिवारी आपल्या पत्नीसह डीमार्टमध्ये घरी लागणाऱ्या सामानाची खरेदी करण्यासाठी गेले होते. दरम्यानं त्यांचा बारा वर्षांचा मुलगा भूषण आणि दहा वर्षांचा दुसरा मुलगा सानिध्य घरीच होते. घराच दार आड करून दोन्ही मुलं घराच्या छतावर खेळण्यासाठी गेले.

त्याच दरम्यान घरात कोणी नसल्याचं पाहून एका अज्ञात चोरट्यांनं गुपचूप घरात घुसखोरी केली. कोणालाही थांगपत्ता लागायच्या आत चोरट्यानं घरातील दागिने आपल्या बॅगेत भरले आणि काहीचं घडलं नसल्यासारखं तो घरातून बाहेर पडला.

पण छतावर खेळणाऱ्या भूषण आणि सानिध्यची नजर चोरट्यावर पडली. ती अज्ञात व्यक्ती आपल्या घरातून बाहेर निघाली आहे म्हणजे तो नक्कीच चोर असणार या संशयातून दोघा चिमूरड्यांनी आरडाओरडा न करता, चोरट्याचा पाठलाग करायला सुरुवात केली.

चिमुरड्यांनी आपल्या सायकलीवरून तब्बल ३ किलोमीटर पर्यंत त्या चोराचा गुपचूप पाठलाग केला. चोरट्याचीही सुरुवातीपासूनच या दोघांवर नजर होती. पण काही अंतर दूर गेल्यानंतर चोरटा घाबरला आणि त्यानं हातातील दागिन्यांची बॅग रस्त्यावर टाकून तेथून धूम ठोकली.

भूषण आणि सानिध्य या दोघांच्या चतुराईमुळे आईचे चोरीला गेलेले दागिने परत मिळाले आहेत. आई आणि वडील डीमार्टवरून खरेदी करून आल्यानंतर, चिमुरड्यांनी घडलेला सर्व प्रकार आपल्या आई बाबांच्या कानावर घातला. या प्रकरणी अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.