.
‘मुली हे घरातील लक्ष्मीचे रूप’ असते अशी म्हण आहे. तसेच ही म्हण अनादी काळापासून चालत आलेली आहे. तथापि, अनेकांना त्यांच्या घरात मुले हवी असतात. कारण ते घराण्याच्या वंशाचे दिवा असतो अशी परंपरा चालत आली आहे. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत जे मुलींना जन्म देण्यास नकार देतात. अनेकदा मुलीला आईच्या पोटातच मा’रले जाते.
या समाजात असे अनेक लोक आहेत, जे एखाद्या मुलीला जग पाहण्याआधीच नाकारतात. गेल्या अनेक वर्षांत अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. तसेच, अशा अनेक महिला असतात ज्या मुलीला जन्म देण्यास उत्सुक असतात. परंतु तिचे कुटुंबीय त्या कारणावरून त्यांचा छळ करतात. गेल्या काही वर्षांत सरकारने या विषयावर कठोर पावले उचलल्याने डॉक्टरही याबाबत अधिक जागरूक झाले आहेत.
मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक कायदेही करण्यात आले आहेत. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अजूनही मुली भेदभावापासून मुक्त झालेल्या नाहीत. आज आपण त्याच विषयावर चर्चा करणार आहोत की ज्या कुटुंबात पहिल्या मुलीनंतर दुसरी देखील मुलगी झाली म्हणून तिचे वडील नाराज झाले होते आणि जन्मताच दुसऱ्या मुलीला संपून टाकण्याबाबत विचार केला होता. परंतु तीच मुलगी आज बॉलिवूड वर अधिराज्य गाजवत आहे.
आज आपण जीचेबद्धल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे अभिनेत्री पूजा चोप्रा. पूजा चोप्राच्या वडिलांना पहिल्या मुलीच्या जन्मानंतर मुलगा हवा होता. पण मुलगी झाल्याने तिच्या वडिलांचा संताप वाढला होता. संतापलेल्या वडिलांनी तिला मारून टाक, असं तिच्या आईला सुनावले होते.
तीच मुलगी मोठी झाल्यावर तीने आपले पाऊल बॉलिवूडमध्ये मजबुतपणे रोवले आणि वडिलांचे नाव रोशन केले. अभिनेत्री पूजा चोप्रा हल्ली तिच्या येणाऱ्या ‘जहां चार यार’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. स्वरा भास्कर, मेहर विज, शिखा तलसानिया आणि पूजा चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. पूजा चोप्रा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यानच तिने एक महत्वाचा खुलासा केला आहे.
नवभारत टाइम्सशी बोलताना अभिनेत्री पूजा चोप्रा बोलली की, “माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील नाखुश होते. त्यांना माझ्या जन्मा पूर्वीच एक मुलगी होती. त्यामुळे त्यांना दुसऱ्या वेळी मुलाची अपेक्षा होती. पुढे पूजा चोप्रा म्हणाली की जेव्हा मी जन्मले आणि दुसरी देखील मुलगीच झालीय हे झालीय हे जेव्हा वडिलांना समजले, तेव्हा तिच्या वडिलांचा स्वतावरील ताबा सुटला.
त्यावेळी संतापून वडील म्हणायचे की, मला मुलगा हवा होता, मुलगी नको होती. या मुलीला (पूजाला) तुम्ही अनाथ आश्रमात देऊन द्या, किंवा तिला मारून टाका,” असं वडील बोलायचे. जन्मापूर्वीच पूजाला एक सात वर्षांची मोठी बहीण देखील होती. नंतर दुसरी मुलगी झाल्याने तिच्या वडिलांनी तिच्या आईला सांगितले की, मला दुसरीही मुलगी अजिबात नकोय. मुलगा हवा आहे.
एकतर हिला अनाथ आश्रमात द्या किंवा मग मारून तरी टाका. झालेल्या प्रकारामुळे पूजाची आई चांगलीच घाबरली होती. वडिलांच्या या कृत्यामुळे आई दोघीं मुलींनाही घेऊन माहेरी निघून आली आणि पालनपोषण करण्यासाठी तिच्या आईने नोकरी सुरू केली. आई सकाळी कामावर गेल्यानंतर रात्री उशिरा परत घरी यायची. पूजा लहान होती.
त्यामुळे जेव्हा तिला भूक लागायची आणि रडायची तेव्हा शेजारी राहणाऱ्या काकू तिला दूध पाजायच्या, असं पूजाने याबाबत खुलासा करताना सांगितलं. अभिनेत्री पूजा चोप्राचा, ‘जहां चार यार’ हा चित्रपट महिलांच्या लैंगिक इच्छांवरील विषयावर करण्यात आलेला आहे. हा चित्रपट कमल पांडे यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटात चार मध्यमवर्गीय महिलांची कहाणी दाखवलेली आहे.