दागिने चोरण्यासाठी या चोराने वापरली अनोखी शक्कल , पण पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आत शोधून काढले , वाचा इथे

जरा हटके

। नमस्कार ।

सध्या सर्वत्र ठिकाणी चोरी भरपूर ठिकाणी होत असल्याची बातमी कानावर येत असते. चोरी करण्यासाठी चोर आता तऱ्हेतऱ्हेच्या डोकॅलिटीच्या कल्पना वापरून चोरी करू लागले आहेत. ऑनलाइन फसवणूक तर हल्ली खूपच होते. तसेच आता ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवुन सोनाराला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे भलतेच खोटे मॅसेज दाखवुन सोनाराकडून तब्बल सव्वा चार लाखाचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या एका चोराला कल्याण क्राइम ब्रांचने  २४ तासात गजाआड केलं आहे. त्या चोराचे नाव विनय लोहिरे आहे.  
       
मुंबई मधील डोंबिवली येथे पूर्वेला नार्वेकर ज्वेलर्स नावाचं एक दागिन्यांच दुकान आहे. या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने एक इसम दुकानात घुसला. सोने खरेदी केल्यानंतर त्याने त्या दुकान मालकाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले आहेत असा एक खोटा मॅसेज दाखवला. तो मॅसेज दुकानदाराने पाहिल्यावर त्या इसमाला जाऊ दिले.

मात्र काही वेळाने पैसे ट्रान्सफर झाले नसल्याची गोष्ट निदर्शनास येताच त्या मालकाने त्या गोष्टीची शहानिशा केली. शहानिशा झाल्यावर त्या इसमाने दाखवलेला मॅसेज हा खोटा असल्याचे दुकानदाराने ओळखले. हा चोरटा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्या दुकान मालकाने त्वरित ही गोष्ट डोंबिवली पोलिस ठाण्यात कळवून तक्रार नोंदवली.

कल्याण क्राइम ब्रांचने देखील या गुन्ह्याचा त्वरित तपास सुरू केला. अवघ्या चोवीस तासाच्या आत सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे या अंबरनाथ येथून कल्याण क्राइम ब्रांच ने या चोराला गजाआड केलं. याआधी देखील विनयवर पुणे व ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.

कल्याण क्राईम ब्राँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  संजीव जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक भूषण दायमा , पोलीस उपनिरीक्षक , नितीन मुदगुन, मोहन कळमकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक  विलास मालशेटे,पोलीस हवालदार-अरविंद पवार,निवृत्ती थेरे,सुरेश निकुळे,दत्‍ताराम भोसले इत्यादी कर्मचारी या कारवाईत सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published.