। नमस्कार ।
गेल्या एक ते दोन आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने घातलेलं थैमान पाहायला मिळालं. राज्यात झालेल्या या अति पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं तर काही ठिकाणी नदींना पूर आल्याच्या घटना घडल्या. गेल्या एक ते दोन आठवड्यात राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ११० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे आणि ९० हुन अधिक जण अजूनही बेपत्ता आहेत.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे गावात भूस्खलन होऊन घरांवर दरड कोसळल्याची ध’क्का’दायक घटना देखील समोर आली होती. त्यांना तब्बल १७ तासानंतर या गावात मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १४ जणांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झाली होती.
पण याठिकाणी एक कुत्रं मागील दोन-तीन दिवसांपासून त्या भर पावसात आपल्या मालकाला शोधत होता. या कुत्र्याला NDRF च्या जवानांनी अनेकदा तिकडून दूर हाकलण्याचा ही प्रयत्न केला आहे. पण हे कुत्रं पुन्हा पुन्हा तिथे त्या घटनास्थळी आपल्या मालकाला शोधण्यासाठी येत होत.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतं आहे. मालकाचं घर आणि मालक दिसत नसल्यानं हे कुत्रं सैरवैर झालं होत. NDRF च्या एका जवानानं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाल्यापासून हे कुत्रं याठिकाणी ठाण मांडून होता. त्याच्या मालकाचं घरही इथेच होतं. पण आता अचानक याठिकाणी कोणीच व काहीच दिसत नसल्यामुळे हे कुत्रं पुन्हा पुन्हा त्याच जागेवर येऊन उभा राहत होता.
बघा विडिओ :-
भूस्खलनामुळे मालकाचं घर ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. मालकाला शोधतानाचा मुक्या जीवाचा व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/882dSfgNma
— News18Lokmat (@News18lokmat) July 25, 2021