..त्याने स्वतःच बलिदान देत वाचवला तिघांचा जीव , वाचा इथे >>

जरा हटके

। नमस्कार ।

जिल्हा अहमदनगर शहरातील धबधब्यावर हा दु’र्दैवी घ’टना घडली. पाण्यात बुडणाऱ्या तीन जणांचे प्राण वाचवण्यात यश आल्यानंतर शेवटी तो दमल्यामुळे एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मयूर परदेशी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तिघांचे प्राण वाचवणाऱ्या या तरुणाचा दम लागून शेवटी मृत्यू झाल्यामुळे अहमदनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.

कशाचाही विचार न करता त्याने धबधब्यात उडी घेतली आणि तिघांना वाचवलं :- मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर शहरातील काही तरुण मित्र एकत्र धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी हे तिघेही पाण्यात पोहण्यात मग्न होते. मात्र, तिथे पोहत असताना त्या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि हे तिघेही धबधब्यात बुडत होते.

हा सर्व प्रकार घडत असताना मयूर परदेशी या तरुणाची नजर त्यांच्याकडे गेली. मयूरने कशाचाही विचार न करता किंवा क्षणाचाही विलंब न करता त्याने धबधब्यात उडी घेतली आणि एकएक करुन तिघांनाही पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, पाण्याचा प्रवाह खूपच जोरात होता. त्या पाण्याच्या प्रवाहातून तिघांनाही सुखरूप बाहेर काढत असताना मयूर परदेशी दमला. शरीरातील त्राण गेल्यामुळे शेवटी धबधब्याच्या काठावर येईपर्यंत परदेशी याला दम लागला. आणि यातच त्याचा पाण्यात बुडून मृ’त्यू झाला.

पोहून थकल्यामुळे शेवटी पाण्यात बुडाला :- तिघांना वाचवणारा मयूर बुडत असताना त्याला सर्वजण तिथे पाहत होते. मयूरला बुडताना पाहून इतरांनी खूप आर’डाओरड केली. त्याच्यानंतर तेथे काही उपस्थित तरुणांनी मयुरच्या मदतीसाठी धबधब्यात उडीदेखील घेतली. मात्र तोपर्यंत मयूरच्या शरीरात त्राण नसल्यामुळे अखेर पाण्यात बुडाला. त्याला पाण्यातून बाहेर काढून त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृ’त घोषित केले.

अहमदनगरमध्ये शोककळा :- दरम्यान, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता स्वतःच बलिदान देत त्या तिघांना जीवनदान देणाऱ्या या तरुणासोबत घडलेल्या या प्रकारामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तिघांना वाचवण्यासाठी त्याने दाखवलेल्या हिमतीचेही अनेकांनी कौतुक केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.