l नमस्कार l
तोंडाच्या आतमध्ये फोड (तोंड येणे) आले तर किती त्रास होतो? हे ज्याला येत त्यालाच कळत. अन्न नीट खाऊ शकत नाही, कोणाशीही नीट बोलू शकत नाही असं सहन करावे लागणारे दुख वेगळेच.
जवळजवळ सर्वच लोकांना तोंडाच्या फोडांच्या वेदना एका वेळी अनुभवल्या असतील. पोटदुखी हे फोड येण्याचे प्रमुख कारण असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. याशिवाय व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे तोंडात वारंवार फोड येतात. या समस्येचा सामना कोणत्या परिस्थितीत होऊ शकतो हे जाणून घेऊया.
तोंडात अल्सर येण्याची कारणे :- पोट खराब झाल्यामुळे किंवा बद्धकोष्ठता. व्हिटॅमिन बी-12, लोह, फॉलिक ऍसिड आणि झिंकची कमतरता. तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे. खराब दर्जाचा ब्रश वापरल्यामुळे. सोडियम लॉरील सल्फेट असलेले टूथपेस्ट किंवा माउथवॉश वापरून. काही अन्नपदार्थाच्या ऍलर्जीमुळे.
तोंड येत त्यावरील हे घरगुती उपाय :- कोरफड :- कोरफड ही वनस्पती जवळपास सर्वच शरीरावरील जखमांवर गुणकारी आहे. त्याच बरोबर तोंड आल्यावरही तिचा तेवढाच पुरेपूर उपयोग होतो. कोरफडीचा गर काढून तो तोंडातील फोडावर लावल्याने तोंडाला थोडा आराम मिळतो.
बर्फ ही देईल आराम :- तोंड आल्यानंतर त्या फोडावर बर्फ फिरवल्यामुळे तोंडाला थोडा वेळ आराम मिळू शकतो. आपल्याला तोंड येण्याचं मुख्य कारण हे आपल्याला शरीरातील उष्णता असते. त्यामुळे बर्फ शरीरात थंडावा निर्माण करून आराम पोहोचवतो.