.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध कॉमेडी शोमधील अनेक पात्रांनी देशातील लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. या यादीत अनेकांची नावे दिसत असली तरी बबिता जी केवळ जेठालालच नाही तर देशातील अनेक तरुणांवर क्रश आहेत. बबिता जीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दिवसभर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मात्र काही वेळा त्यांना असभ्य कमेंटलाही सामोरे जावे लागते.
14 वर्षांपासून चालू आहे हा शो :- तारक मेहता का उल्टा चष्मा हा भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारा टीव्ही शो आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा शो आता 14 वर्षांपेक्षा जुना झाला आहे. जेठालाल गडा (दिलीप जोशी), दया गडा (दिशा वाकानी) आणि इतर अनेक नावांसह, शोमधील पात्रे खूप लोकप्रिय झाली आहेत.
बबिता जीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत :- यामध्ये बबिता जी चे पात्र देखील आहे जे खूप लोकप्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिरेखा आहे. म्हणूनच तिची खूप प्रशंसा केली जाते. मुनमुन दत्ता ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मुनमुन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. यामुळेच तीचा फोटो, व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल होतो.
मात्र, जिथे काही लोक तीच्या फोटोवर स्तुतीसुमने उधळतात, तिथेच काही समाजकंटकही आहेत जे अ’श्लील कमेंट करायला मागेपुढे पाहत नाहीत. असेच काही तिच्या एका पोस्टमध्ये घडले, जेव्हा तिने भारतीय पोशाखातील एक फोटो शेअर केला. लाखो लोकांनी हा फोटो लाईक केला. पण कॉमेंट करताना प्रत्येक मर्यादा ओलांडणारी एक व्यक्ती होती. आणि कमेंट करताना त्याने कॉमेंट मध्ये बबीताला एका रात्रीची किंमत विचारली होती.
बबीताने दिले समर्पक उत्तर :- दुसरी कोणती अभिनेत्री असती तर तिने त्याकडे दुर्लक्ष केले असते. कारण सहसा बहुतेकजण त्यांच्या कॉमेंट बॉक्स मधून असे गैरवर्तन करत राहतोच. पण मुनमुनला असा अपमान सहन होत नाही. असा गैरवर्तन तीला अजिबात आवडले नाही आणि तीने त्याला त्याच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले.
खरंतर, 2018 साली मुनमुन दत्ताने सेटवरून स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये ती पिवळ्या रंगाची घागरा चोली परिधान करून खूपच सुंदर दिसत होती. जिथे एकीकडे चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नव्हते. घाणेरडी कमेंट करताना एका यूजरने तीला ‘एक रात का कितना’ असे विचारले होते. ही कमेंट वाचल्यानंतर मुनमुन दत्ताने तिची शीतलता इतकी गमावली की, तीने सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहून त्याला प्रचंड शि’वीगाळ केली.
चाहत्यांवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करणारी मुनमुन दत्ता पहिल्यांदाच अशाप्रकारे राग करताना दिसली आहे. मुनमुनने त्या ट्रोलला शि’वीगाळ करत लिहिले, ‘तुला ब्लॉक करण्यापूर्वी तुझी लायकी सर्वांना दाखवायची होती. तुझ्यात हिम्मत असेल तर समोर ये आणि बोल. आणि आणखी एक गोष्ट, मी तुला ब्लॉक करण्यापूर्वी तुझी लायकी दाखवणे चांगले राहील असे मला वाटते. समजले, अशिक्षित माणसा, आता इथून तुझा विकृत चेहरा घेऊन निघून जा आणि दुसरा कुठेतरी गोंधळ घाल.’