टाइगर श्रॉफ सोबतच्या ब्रेकअप नंतर दिशा पाटनीच्या आयुष्यात आला नवीन बॉयफ्रेंड ? आता ‘या’ प्रसिद्ध मॉडलला करत आहे ‘डेट’….

बॉलिवूड

.

बॉलीवूड कलाकार आजकाल त्यांचे नाते एकमेकांची खात्री होईपर्यंत गुपित ठेवतात. पण सोशल मीडियावर ते एकमेकांसोबतच्या फोटोंमध्ये नजरेस पडतात, तिथल्या एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात. काही सेलिब्रिटी हे करत नसले तरी ते फक्त एकत्र दिसतात आणि मीडियाच्या प्रश्नांवर मात्र गप्प राहतात.

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते पण त्यांनी कधीही अधिकृतपणे डेटिंगचा स्वीकार केला नाही. अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. यानंतर आता दिशा पाटनीच्या आयुष्यात नवा बॉयफ्रेंड आला असल्याच्या चर्चा आणि अटकळांना जोर आला आहे.

मीडियामध्ये सुरू असलेल्या चर्चांनुसार, दिशा सध्या तिचा जुना मित्र, मुंबईस्थित मॉडेल-अभिनेता अलेक्झांडर अॅलेक्स इलिकला डेट करत आहे. दिशा आणि टायगर एकमेकांच्या जवळ होते त्या दिवसातही दोघे खूप एकत्र दिसले होते. पण दिशाचे टायगरसोबतचे ब्रेकअप झाल्यानंतर दिवाळीच्या दिवशी जेव्हा अॅलेक्सने दिशासोबतचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला तेव्हा दोघेही एकत्र असताना गोष्टी घडू लागल्या.

अॅलेक्स आणि दिशा जिममध्ये एकत्र वर्कआऊट करताना दिसतात. अॅलेक्स आणि टायगर हे देखील मित्र आहे आणि ते अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहे. मॉडेलिंगसोबतच अॅलेक्स अभिनयातही हात आजमावत आहे. क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकही त्याची चांगली मैत्रीण आहे.

अलेक्झांडर अॅलेक्स कोण आहे :- अलेक्झांडर अॅलेक्स एक सर्बियन अभिनेता-मॉडेल आहे. ज्याचा जन्म बेलग्रेडमध्ये झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अलेक्झांडरने मॉडेलिंग आणि अभिनय हे करिअर म्हणून निवडले आणि मुंबईत आला. येथे त्यांनी दीर्घकाळ जिम ट्रेनर म्हणूनही काम केले. एकता कपूरच्या Chameleon या वेबसीरिजमध्ये अॅलेक्सने इस्त्रायली व्यक्तीची भूमिका साकारली होती.

अॅलेक्सचे हे पदार्पण होते. दिशा पटानीसोबत तो वेळोवेळी त्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो, पण दिशा टायगरसोबत खूप दिवसांपासून होती, त्यामुळे त्याच्या सिकंदरसोबतच्या जवळीकतेची चर्चा झाली नाही. पण इथे ती सतत अलेक्झांडरसोबत दिसत आहे आणि दोघांच्या डेटींग चा अंदाज लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.