झाडाखाली आरामात झोपली होती ही महिला, अचानक महिलेवर चढला किंग कोब्रा, पुढे जे घडले ते पाहून तुमचेही उडतील होश…

जरा हटके

.

नुकताच असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत. सर्वांनाच हळहळणारी ही घटना पाहून लोकांचेही होश उडाले आहे. अलीकडेच एक महिला खाटेवर आराम करताना दिसत आहे तर तिच्या अंगावर किंग कोब्रा बसलेला आहे.

भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये साप महिलेच्या वर बसलेला दिसत आहे आणि ती त्याच स्थितीत राहून मदतीसाठी हाक मारत आहे. धक्कादायक क्लिप शेअर करताना IFS नंदा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काय होईल? हे घडल्यावर तुमची प्रतिक्रिया काय?’ फुटेजमध्ये साप महिलेवर बसलेला दिसतो आणि हल्ला करायला फणा उभारून दंश करण्यास तयार होता.

किंग कोब्रा बसला महिलेच्या अंगावर :- पोस्टच्या कॅप्शननुसार, साप महिलेच्या पाठीवर काही मिनिटे बसला होता, तो कोणालाही इजा न करता निघून गेला. हा व्हिडिओ शेअर झाल्यापासून इंटरनेटवर लोक देखील पाहून थक्क झाले आहे. हा व्हिडिओ 54 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

एका यूजरने लिहिले की, ‘मी देखील तिथल्या महिलेप्रमाणेच प्रतिक्रिया दिली असती. शांतपणे शिवाचे नामस्मरण करा! हा व्हिडिओ पुरावा आहे की देवावरील विश्वास जीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देण्यास बळ देतो. आणखी एक युजर म्हणाला की, ‘उत्तम प्रतिसाद म्हणजे अजिबात प्रतिक्रिया न देणे.’

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या :- एका वापरकर्त्याने लिहिले की, हे खूप धोकादायक सिद्ध होऊ शकते. दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘माझ्या माहितीनुसार साप माणसांना जास्त घाबरतात. मला असे वाटते की कोणाचीही शत्रुत्वाची वृत्ती असल्याशिवाय ते हल्ला करणार नाहीत, त्यामुळे शक्य असल्यास अशा वेळी गप्प बसावे.

त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘त्या महिलेने चांगले केले! अर्थात ती भीतीने थरथरत असावी पण घाबरली नाही. सापाला कोणत्याही प्रकारे धमकावली नाही. संयम आवश्यक आहे. धोक्याची कोणतीही चिन्हे सापाला हल्ला करण्यास भाग पाडू शकतात. या घटनेचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.