…जेव्हा दरड कोसळते … जीवघेणी दरड कशी कोसळते ते पाहून अंगावर काटा उभा राहील , बघा इथे

विडिओ

। नमस्कार ।

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटनाही समोर येत आहे. पावसाबरोबरच गेल्या काही दिवसात कोकणासह अनेक भागात दरड कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. आतापर्यंत अनेक घरे-दारे आणि माणसं देखील या दरडीखाली गाडली गेली आहेत. तर यामध्ये त्यातील बऱ्याच जणांचा दुर्देवी अंतदेखील झाला आहे. वारंवार याबाबतच्या बातम्या समोर येत आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक दरड कोसळत असतानाचा व्हिडीओ वायरल होत आहे. हा व्हिडीओ पिथौरागड येथील आहे अस सांगण्यात येत आहे. या भागातील हा दरड कोसळतानाचा धक्कादायक व्हिडीओ बघून अंगावर शहारे येतील. एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमधून हे दृश्य रेकॉर्ड केलं आहे. पाहता पाहता क्षणार्धात डोंगरावरील मोठा भाग रस्त्यावर कोसळतो.

महाडमध्ये तळीये गावावर मुसळधार पावसात मोठी दरड कोसळून दुर्घटना घडली आहे. त्या तळीये गावातील ३५ घरांवर ही दरड कोसळली असून आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे बचावपथक दाखल झाले असून बचाव आणि शोधमोहिम मोठ्या वेगाने सुरू आहे. घटनास्थळी तेथील उपस्थित स्थानिक नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.

पोलादपूर तालुक्यात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू :- तर तिकडे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर सुतार वाडी येथे दरड कोसळून आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे त्याचबरोबर अजून ५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत अस सांगण्यात येत आहे. तर अजून ४ जण खूप जखमी झाले असल्याची माहिती समजली आहे. या गावांना जोडणारे पितळवाडी – उमरठ फाटा पूल आणि उमरठ फाटा ते साखर पूल ही दोन्ही पुलं वाहून गेल्यामुळे तिथे मदत यंत्रणा पोहोचू शकत नाही.

बघा विडिओ :-


सोर्स :- लोकमत

Leave a Reply

Your email address will not be published.