.
आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करणारी जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूर ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. एक काळ असा होता की जान्हवीला सर्वजण श्रीदेवीची मुलगी म्हणून ओळखत होते, पण आता जान्हवी तिच्या नावामुळे आणि कामामुळे ओळखली जाते.
जान्हवीचे वडील बोनी कपूर, जे चित्रपट पार्श्वभूमीचे आहेत, एक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. तीची आई बॉलीवूडमधील सर्वात सुंदर नायिका होती. अगदी लहान वयातच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला होता. या गोष्टीचं दु:ख जान्हवीच्या मनात कायमच राहिल.
श्रीदेवी जान्हवीचे बॉलीवूड मधील पदार्पण पाहू शकली नाही :- प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांना आयुष्यात यशस्वी झालेलं पाहण्याची इच्छा असते. त्याचबरोबर यशाची शिडी चढताना आई-वडिलांनी नेहमी सोबत असावे, अशीही मुलांना इच्छा असते. श्रीदेवीलाही तिची मुलगी जान्हवी कपूरला बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचे होते.
पण तिचा पहिला ‘धडक’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला. मात्र, आईच्या जाण्याने हिंमत न हारता जान्हवीने मेहनत घेतली आणि आज तिची गणना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये केली जाते.
जान्हवी कपूर युथ आयकॉन आहे :- जान्हवी कपूर ही अशी अभिनेत्री आहे जी नेहमीच तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हा एक असा ब्रँड आहे जो प्रत्येकजण फॉलो करतो. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे आणि ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.
ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करते जे येताच मीडिया वर दहशत निर्माण करतात. जान्हवी सर्व प्रकारच्या ड्रेसमध्ये छान दिसते. तिने बिकिनी किंवा साडी नेसलेली असो, ती नेहमीच आत्मविश्वासाने प्रत्येक पोशाख कॅरी करते आणि तिच्या चाहत्यांची मने जिंकते.
नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात ती जिममध्ये जाताना दिसत आहे. जान्हवी नेहमीच घट्ट कपडे घालताना दिसते. जिममध्ये जाताना ती अनेकदा अशा कपड्यांमध्ये स्पॉट झाली आहे. नुकतेच तीचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र त्याची चर्चा होत आहे.