। नमस्कार ।
आपण नेहमी आपल्या त्वचेबद्दल खूपच काळजीत असतो. उन्हाळ्यात त्वचेचा काळसरपणा दूर करण्यासाठी अनेकदा अनेक वेगवेगळे उपाय केले जातात, पण काही वेळा काही गोष्टींचा फारसा परिणाम होत नाही.
म्हातारपणात देखील अस तुमचे वजन कमी करा :- तुमच्या त्वचेवरील काळसर डाग दूर करण्यासाठी साबुदाणा पावडरमध्ये थोडे कच्चे दूध मिसळून चेहऱ्यावर लावा. असे केल्याने तुमच्या चेहऱ्याची चमक वाढेल आणि चेहऱ्यावरील काळसर डाग निघून जातील.
तुमच्या त्वचेला सुरकुत्यापासून वाचवण्यासाठी साबुदाणा बारीक करून त्यात अंड्याचा पिवळा भाग मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने ते थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या हळू हळू कमी व्हायला सुरुवात होईल.
केसगळती वर एक छोटासा उपाय :- जर तुम्ही तुमचे केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर साबुदाण्याचे दाणे बारीक करून त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल मिसळा. अर्ध्या तासासाठी केसांवर ठेवा. नंतर ते कोमट पाण्याने धुवा , यामुळे केस गळणे कमी होईल.
तुमच्या केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी, साबुदाणा पावडरमध्ये गुलाब पाणी आणि दही मिसळा आणि केसांवर लावा. एका तासानंतर कोमट पाण्याने धुवा. काही दिवसात तुमच्या केसांची हरवलेली चमक परत येईल.
टीप :- ही माहिती इंटरनेट वर मिळाली असून हे उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. धन्यवाद.