गाईचा नवीन मालक तिला घेऊन जात होता, गाईला जाताना बघून बैल तिचा पाठलाग करू लागला. बघा वायरल व्हिडिओ.

बॉलिवूड

.

सोशल मीडिया हे आत्ताच्या काळातले प्रसिद्ध असे मनोरंजनाचे माध्यम आहे. जिथे लोक आपले मनोरंजन करायला वेगवेगळे व्हिडिओ बघतात, तर काही दुसऱ्याचं मनोरंजन करण्यासाठी  वेगवेगळे व्हिडिओ बनवून अपलोड करत असतात.

हे व्हिडिओ कधी कधी सोशल मीडियावर खूप धिंगाणा घालतात. काही व्हिडिओ युजर्सना इतके आवडतात की, ते व्हिडिओ खूप वायरल होतात.असाच एक वायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

हा वायरल व्हिडिओ बघून तुम्हाला आनंद होईल. हा व्हिडिओ गाय व बैल यांच्या संबंधित आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या दोघांचे नाते किती घट्ट आहे. व्हिडिओ पाहून माणसांसारखे वागत असल्याचे तुमच्या लक्षात येईल.

या पृथ्वीवर प्रत्येक सजीवाला भावना आहेत असे म्हटले जाते.  मानावाप्रमाणे प्राण्यांनाही भावना असतात. असंच काहीसं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहायला मिळेल. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की एका टेम्पोमध्ये एक गाय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, गाईला मालकाने दुसऱ्या व्यक्तीला विकले तो व्यक्ती गाईला घेऊन जातोय. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, त्या टेम्पोच्या मागे मागे एक बैलही धावत आहे.

बैलाचं हे गाईवरचं प्रेम बघून नेटकरीदेखील खूप खुश होत आहेत. गाय आता बैलापासून लांब जाणार म्हणून बैल तिच्या मागेमागे जातो. गाईला तिचा नवीन मालक घेऊन जात असताना बैल त्यांचा पाठलाग करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच वायरल होत आहे. या व्हिडिओला लोकही खूप पसंत करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.