.
बॉलीवूडचे अनेक स्टार कपल्स आहेत, ज्यांनी प्रेमासमोर ना जोडीदाराचे वय पाहिले, ना धर्म बघितला आणि अखेर लग्न केले. सायरा बानोने 22 वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न करून स्वतःला तसेच अख्या दुनियेला आश्चर्यचकित केले. हेमा मालिनी यांनीही धर्म बदलून धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला होता.
एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्यापेक्षा २९ वर्षांनी लहान असलेल्या जोडीदाराशी लग्न केले होते. प्रेमासमोर कोणाचेच काही चालू शकत नाही. काही बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांनी 2-3 लग्नं करून आपल्या मुलीच्या वयाचा जोडीदार आपला जीवनसाथी बनवला. सैफ अली खानने आधी वयाने मोठ्या अभिनेत्रीशी म्हणजेच अमृताशी लग्न केले, त्यानंतर वयाने लहान करिना कपूरला आपली जीवनसाथी बनवले.
बॉलिवूडच्या या जोडप्यांमधील वयाचे अंतर जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल :- धर्मेंद्र आणि हेमा मालिनी 1970 मध्ये ‘तुम हसीन मैं जवान’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळी हेमा मालिनी यांनी संजीव कुमार आणि जीतेंद्र यांसारख्या स्टार्सचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता.
धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि तीच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे होते, तरीही हेमा मालिनी यांनी त्यांच्याशी लग्न केले. लग्नापूर्वी दोघांनीही धर्म बदलण्याचा निर्णय घेतला होता. दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांनी वयाच्या 44 व्या वर्षी निम्म्या वयाच्या सायरा बानूशी लग्न केले. दोघांचे प्रेम हे आजच्या पिढीसाठी एक उदाहरण आहे. दोघांनी 55 वर्षे एकत्र घालवली. दिलीप कुमार यांनी 7 जुलै 2021 रोजी अखेरचा श्वास घेतला.
कबीर बेदींनी बॉलिवूडशिवाय हॉलिवूडमध्येही नाव कमावले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी प्रवीण दुसांझ यांच्याशी चौथे लग्न केले. दोघांच्या वयात २९ वर्षांचा फरक आहे. संजय दत्तने 2008 मध्ये 19 वर्षांनी लहान मान्यतासोबत लग्न केले. हे त्यांचे तिसरे लग्न होते. संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मा हिचा 1996 मध्ये ब्रेन ट्युमरमुळे मृ’त्यू झाला होता, तर त्याची दुसरी पत्नी रिया पिल्लई हिचा 2005 मध्ये घटस्फोट झाला होता.
सैफ अली खानने 1991 मध्ये आपल्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी अभिनेत्री अमृता सिंगशी पहिले लग्न केले, त्यानंतर 2004 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर सैफने 2012 मध्ये त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूरशी लग्न केले, ज्यापासुन त्यांना दोन मुले आहेत.
शाहिद कपूरच्या अफेअरची अनेक अभिनेत्रींसोबत चर्चा झाली, पण त्याने मीरा राजपूतला आपली जीवनसाथी बनवले जी त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. आज त्यांना दोन मुले आहेत.
मिलिंद सोमणने 25 वर्षांनी लहान अंकिता कोंवर सोबत 2018 मध्ये लग्न केले. मिलिंद सोमण एक सुपरमॉडेल आणि अभिनेता आहे आणि तो त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.