केस कापल्याने केसांची वाढ होते का? केसगळती थांबते का ? काय खरं काय खोटं , बघा इथे

आरोग्य

। नमस्कार ।

केस कापण्यासाठीची बरीच कारणे असतात. कोणी केस व्यवस्थित सेट राहावेत यासाठी ते कापत असतात, कोणाकोणाला स्वतःची हेअरस्टाईल बदलायची असते म्हणून ते केस कापत असतात तर कुणी केस दुभंगतात म्हणून ते केसांवर ट्रिम करतात.

पण याबरोबरच अशाही काही मुली , स्त्रिया असतात ज्या डोक्यावरील केस गळून खूपच पातळ झाले आहेत यावर उपाय म्हणून हा त्रास कमी होण्यासाठी केस कापतात. पण खरंच असे केस कापणे फायद्याचे ठरते का ? कापल्यामुळे केस मजबूत होऊन त्यांचं गळणं कमी होतं का ?

या विषयाबद्दल बोलताना सौंदर्यतज्ज्ञ डॉ. मंजुल अग्रवाल असे म्हणतात की केस वाढत नसतील , त्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी त्या स्त्रिया ते वारंवार कापतात. पण खर तर केस कापण्याचा आणि त्यांच्या वाढीचा काहीही संबंध नसतो.

कारण केसांची वाढ होण्यासाठी आपल्या स्काल्पमध्ये असणारे फॉलिकल्स उपयुक्त ठरत असते आणि केस कापण्याचा आणि या फॉलिकल्सचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे केस अजून वाढण्यासाठी ते कापत असाल, तर तसं करू नका. त्यापेक्षा केसांंचं ट्रिमिंग करणं अधिकतम फायद्याचं ठरतं.

केस छान वाढवायचे आहेत, मग हे उपाय करा.

– केस वरच्या वर परत परत कापल्यामुळे ते काही वाढणार नाहीत आणि बाजारातील महागड्या कॉस्मेटिक्सचा केसांवर लावल्यानेही त्याचा काही उपयोग होणार नाही. केस छान वाढवायचे असतील तर केसांना योग्य पोषण मिळणं गरजेचं आहे.

– हे पोषण आपल्या शरीराला आपल्या आहारातून मिळत असत. त्यामुळे आपल्या आहारात केसांच्या वाढीसाठी उपयुक्त पदार्थ घ्यायला हवेत. गाजर, हिरव्या पालेभाज्या, दुध, पनीर, छोले, चणे, सोयाबीन, बदाम, अक्रोड असे पदार्थ घ्यावेत.  

– केसांना व्हिटॅमिन सप्लिमेंट दिल्यानेही त्याचा केसांवर चांगला परिणाम झालेला दिसून येतो. व्हिटॅमिन सप्लिमेंटमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक आणि लोह असते. ही खनिजे स्काल्पला पोषण देतात. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येतो.

Leave a Reply

Your email address will not be published.