काय तुमच्या सुद्धा केसांची वाढ होत नाहीय ? तर रोज सकाळी उपाशीपोटी खा या ३ गोष्टी, बघा केसांवर जादू

आरोग्य

l नमस्कार l

आपले केस लांब लचक असायला हवेत असे प्रत्येकीच स्वप्न असत. केस जर लांबलचक असतील तर त्यांना वेगवेगळ्या सोप्या , भारी केसांच्या स्टाईल करता येतात त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडते.  पण बऱ्याच कारणांमुळे कित्येक तरुण मुलींचे केस काही केल्या वाढतच नाहीत.

केस वाढवे यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बाजरी तेलं लावून पाहतात, तर कधी केसांची ट्रीम केल्यावर वाढतील हा गैरसमज बाळगून दर दोन ते तीन महिन्यांनी केस कापत असतात. असे बरेच उपाय केले जातात. इतकंच नव्हे तर केस वाढावेत यासाठी बरेचदा पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा सारख्या महागड्या ट्रीटमेंटही घेऊन बघतात.

पण तुमच्याही केसांची वाढ होत नसेल किंवा तुम्हाला लांबलचक केसांची हौस असेल तर काही हे घरगुती सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. बाजारातल्या महागड्या ट्रीटमेंट्स करण्यापेक्षा आणि महागडे शाम्पू, कंडिशनर किंवा आणखी काही उत्पादने यांचा वापर करण्यापेक्षा घरच्या घरी हे सोपे उपाय नक्की करुन पाहा. महिन्याभरातच तुम्हाला या उपायांचा गुण दिसल्याशिवाय राहणार नाही हे नक्की 

१. कडीपत्ता :- कडीपत्ता ही एक वनस्पती औषधी म्हणून पण ओळखली जाते. कडीपत्त्याचा जेवणात आवर्जून समावेश करतात. कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असतो असेही आहारतज्ज्ञ बरेचदा सांगताना आपल्याला दिसत असतात. कडीपत्ता हा कुठेही बाजारात सहज उपलब्ध होईल असा घटक असल्या कारणाने हा उपाय करणे तुलनेने सोपे आहे.

भाजी, आमटी किंवा कढी आणि इतर पदार्थांची चव आणण्यासाठीच नव्हे तर कडीपत्ता सौंदर्य खुलवण्याठीही मदत करतो. सकाळी झोपेतून उठल्यावर काहीही न खाता पिता म्हणजेच उपाशीपोटी कडीपत्त्याची ३ ते ४ पाने चावून खाल्ल्यास त्याचा केस वाढण्यासाठी बराच फायदा होतो. कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियमसारखे असे पोषक घटक असल्याने कडीपत्ता खाणे आपल्या आरोग्यासाठी आणि तसेच केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतो. 

२. जवस :- जवसामध्ये ओमेगा ३ जास्त प्रमाणात असल्याने आपल्या आरोग्याबरोबरच केसांचेही पोषण होण्यासाठी जवस फायदेशीर असतात. जवस थोडे भाजून त्याची पावडर बनवायची. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कोमट पाण्यात एक किंवा दोन चमचे पावडर घालून ते पाणी प्यावे. केस वाढविण्याबरोबरच केसांना निरोगी ठेवण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

३. कडुलिंब :- कडूलिंबाची पाने आपल्याकडे साधारणता वसंत ऋतूमध्ये म्हणजेच चैत्र पाडव्याला खाण्याची पद्धत आहे. कडूलिंब खाल्ल्याने उन्हाळ्यातील होणाऱ्या अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. तसेच कडुलिंबाची पाने त्वचेच्या विविध समस्यांवरही अतिशय गुणकारी असल्याचेही म्हटले जाते. कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याचा आरोग्यासाठी तसेच केसांसाठी अतिशय चांगला फायदा होतो. सकाळी रीकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.  

४. नारळपाणी :-  नारळपाणी हे एक पोषक पेय असून ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लहान मुलांपासून ते आजारी व्यक्तींपर्यंत सर्वांना नारळपाणी दिले जाते. शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले ठेवण्यासाठी तसेच शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी नारळ पाण्याचा उपयोग होतो.

त्वचा आणि केस चांगले होण्यासाठी नारळ आणि नारळाचे पाणी अतिशय फायदेशीर ठरते. जास्त प्रमाणात केसगळती होत असेल तर नारळाचे पाणी आवर्जून प्यायला हवे. केसगळती थांबण्याबरोबरच केसांची वाढ होण्यासाठीही सकाळी रीकाम्या पोटी नारळ पाणी पिणे उपयुक्त ठरते. 

Leave a Reply

Your email address will not be published.