करिश्मा-अभिषेक तब्बल 5 वर्ष एकमेकांना करत होते ‘डेट’, एंगेजमेंट होऊन देखील का टीकले नाही नाते, ब्रेकअप मागील ‘खरे’ कारण आले समोर…

बॉलिवूड

.

जेव्हा जेव्हा प्रेम आणि संघर्षाचा विषय येतो तेव्हा अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची नावे नक्कीच समोर येतात. या दोन्ही स्टार्सचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचणार होते, पण एंगेजमेंटनंतर त्यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला. एंगेजमेंटनंतर दोघांचे नाते का संपले हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो.

जया बच्चन यांना करिश्मा कपूर अजिबात आवडत नसल्याच्या अफवा पसरल्या होत्या आणि त्यामुळेच हे नाते तुटले पण आता ब्रेकअपचे खरे कारण समोर आले आहे ज्याने सर्वांनाच धक्का दिला आहे. जरी करिश्मा आणि अभिषेक बच्चन एकेकाळी प्रेमात होते तरीही दोघे एकमेकांसाठी बनलेले नव्हते.

दोघांमध्ये अनेकदा भांडण झाले :- आज इतक्या वर्षांनंतर हे गुपित उघड झाले आहे. या दोघांच्या नात्याबद्दल चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. करिश्मा आणि अभिषेक बच्चन हे एकमेकांसाठी बनलेले नव्हते, असा त्याचा दावा आहे.

सुनील दर्शनने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, अभिषेक आणि करिश्मा कपूर यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते हे खरे आहे. दोघांनी जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते पण दोघांना पाहून कधीच वाटले नाही की ते एकत्र राहू शकतील. सुनीलने सांगितले की, मी स्वतः त्या दोघांच्या एंगेजमेंटला गेलो होतो पण मी फक्त त्यांना एकमेकांशी भांडताना पाहिले.

या दोघांनी ‘हा मैने भी प्यार किया’ या चित्रपटात काम केले होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला होता. चित्रपटासोबतच दोघांच्या नात्यालाही पूर्णविराम मिळाला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडताना दिसले.

तब्बल 5 वर्षे डेटवर गेले :- करिश्मा खूप छान आणि चुलबुली अभिनेत्री आहे, तर अभिषेक खूप शांत आहे… पण तरीही दोघे एकत्र आल्यावर भांडायचे. विशेष म्हणजे नाते तुटल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या मात्र सत्य वेगळेच आहे. आता चाहत्यांनाही या दोन्ही स्टार्सच्या लग्नाच्या ब्रेकअप मागचे कारण कळले असेल.

सध्या दोन्ही स्टार्स आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केले. दोघांनाही एक लाडकी मुलगी आराध्या आहे. तर करिश्मा कपूरने एका बिझनेसमनशी लग्न केले होते. करिश्माला 2 मुलेही आहेत पण अभिनेत्रीने घटस्फोट घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.