नमस्कार
लग्न कार्य सुरू असतात. लग्न कार्यात घाई घाईत काही काम करताना , जेवताना हमखास कपड्यांवर डाग पडतात. हे डाग तेलकट असल्याने ते डाग जाणे खूपच कठीण असते. तसेच अनेक कारणांमुळे कपड्यांवर डाग पडत असतात. लग्नाच्या वेळी हळदीच्या कार्यक्रमामध्ये पडलेले डाग सहजासहजी जात नाहीत. परंतु त्या डागांवर काहीच उपाय नाही असे नाही. काही घरगुती उपाय करून तुम्ही कपड्यांवर पडलेले डाग घालवू शकता.
१) हळदीचा डाग घालवण्यासाठी व्हिनेगर अथवा लिंबू लावा. हळदीचे डाग लगेच निघून जातील. व्हिनेगर आणि लिंबू यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे डाग लगेच निघून जातात. त्यामुळे हा एक सोपा उपाय आहे.
२) आल्याचा रस हा कपड्यांवर पडलेले डाग घालवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. ज्या ठिकाणी डाग पडले आहेत त्या ठिकाणी थोडासा आल्याचा रस लावून कपडे धुतल्यास डाग आरामात निघून जातील.
३) बऱ्याच वेळा आपण जास्त डिटर्जंट वापरतो. परंतु जास्त प्रमाणात डिटर्जंट वापरल्याने कपड्याची लवकर झीज होते. त्यामुळे जिथे डाग पडले असता त्याठिकाणी टूथपेस्ट लावा. डाग निघून जातील.
४) ज्यावेळी कपड्यांवर शाईचे डाग पडतात तेव्हा त्यावर ओल्या शाईवर मीठ लावल्यास डाग निघून जातात. मीठ लावून हे कापड लगेच धुवावे. त्यामुळे डाग लवकर जाईल.
५) आपण बाहेर फिरण्यासाठी जातो, बागेत जातो तेव्हा पानांचे, फुलांचे डाग पडतात. हे डाग घालवण्यासाठी सोप्पा उपाय म्हणजे लिंबू. लिंबू अर्धा कापून डाग आलेल्या भागावर घासावा. त्यामुळे डाग निघून जातात.
६) कपड्यावर पडलेले तेलाचे डाग घालवण्यासाठी डाग पडलेल्या जागी हाताने बेकिंग सोडा पाण्यात मिसळून लावा. असे केल्याने तेलाचे डाग निघून जातील. जर आपले पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर ओल्या हळदीचे डाग पडले असतील तर आपण ते डाग लवकर निघण्यासाठी कोमट पाण्यात ते कपडे अर्धा तास भिजवा नंतर हलक्या हाताने जरी घासले तरी डाग निघून जातील.
७) बऱ्याच वेळा कपड्यावर तेलाचे हि डाग पडतात तेलाचे डाग आपल्या कपड्यावर पडले असल्यास ते घालवण्यासाठी डाग असलेल्या जागी हाताने थोडेसे व्हिनेगर अथवा लिंबाचा रस लावा. असे केल्याने तेलाचे डाग निघून जातील.
आपल्याला कपड्यावर पडलेले हळदीचे आणि तेलकट डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल मस्त मराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.
संदर्भ :- द हेल्थ साईट