.
सलमान खानने इतक्यातच त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला आहे. सलमान खान गेल्या अनेक दशकांपासून देशातील सर्वात पात्र असा बॅचलर राहिला आहे. सलमान खानला कधीच कुठलीही मुलगी पसंत नव्हती असे नाही. सलमान ने सोमी अली संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांना डेट केले आहे.
पण, तरीही सलमान खान बॅचलरच राहिला. सलमान खान आणि ऐश्वर्या राय रिलेशनशिपमध्ये असतानाही त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्या येत होत्या पण सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले. यानंतर सलमान खान आणि कतरिना कैफही रिलेशनशिपमध्ये होते पण काही वर्षांनी दोघांचे ब्रेकअप झाले. ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफमुळे सलमान खानने लग्न केले नाही, असे अनेकदा लोकांना वाटते.
रेखाचा मोठा चाहता आहे सलमान :- पण, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत सलमान खानने स्वत: खुलासा केला की तो अजूनही बॅचलर का आहे. सलमान खानने कबूल केले होते की तो रेखाचा खूप मोठा चाहता आहे आणि स्वतःला तिचा सर्वात मोठा चाहता मानतो. सलमान खानने रेखामुळे लग्न केले नसल्याची कबुली दिली होती.
सलमान रेखाला सगळीकडे फॉलो करायचा :- रेखाने एका मुलाखतीत सलमान खानबद्दल शेअर केले आणि सांगितले की ती जिथे जायची तिथे सलमान खान तिच्या मागे जायचा. त्यावेळी सलमान आणि रेखा एकमेकांचे शेजारी होते. भाईजान तीला पाहण्यासाठी योगा क्लासपर्यंत जात असे. जेव्हा रेखाला सलमान खानच्या वक्तव्याची माहिती मिळाली तेव्हा तिने एवढेच सांगितले की, ‘मी देखील कदाचित यामुळे लग्न केले नाही.’
जेव्हा लग्न मोडले होते :- खूप कमी लोकांना माहित असेल की सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती. दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती पण अखेरच्या क्षणी संगीता बिजलानीने लग्नाला नकार दिला. मात्र, संगीता बिजलानीने सलमान खानला दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्याचे बोलले जात आहे.
बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने मंगळुरू येथे म्हणजेच 27 डिसेंबर रोजी आपल्या आयुष्याची 57 वर्षे पूर्ण केली आहेत. सलमानच्या वाढदिवसानिमित्त एका ग्रँड पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व सिनेतारक सहभागी झाले होते.
अशा परिस्थितीत सलमानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री संगीता बिजलानीही या पार्टीचा एक भाग बनली. यादरम्यान सलमान खान संगीता बिजलानीला किस करताना दिसला.