एकेकाळी बॉलिवूडवर ‘धुमाकूळ’ घालणाऱ्या या बॉलिवूड स्टार्सची आज झालीय ‘दयनीय’ अवस्था, एकाला तर पागलखाण्यात केले रवाना…

बॉलिवूड

.

बॉलिवूड विश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या काळात बॉलिवूडवर जबरदस्त राज्य केले आहे. चित्रपट सृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट देऊन हे कलाकार इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे बनले आहेत. मात्र, नंतर या कलाकारांना विस्मृतीत आयुष्य घालवावे लागले.

अलीकडेच 80-90 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने ‘इंडियन आयडॉल’ शोमध्ये सांगितले की, ती लग्नानंतर यूएसला गेली होती. त्यानंतर मीनाक्षी इंडस्ट्रीतून पूर्णपणे गायब झाली होती. चला तर मग अधिक जाणून घेऊ बॉलिवूडच्या या कलाकारांबद्दल जे आता आपले आयुष्य एकाकी जगत आहेत.

1) मीनाक्षी शेषाद्री :- ‘दामिनी’, ‘घातक’ आणि ‘शहेनशाह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री नुकतीच म्हणाली की, “मी अमेरिकेला गेले होते, तिथे मी पत्नी बनले, आई बनले आणि स्वयंपाकी देखील बनले होते. मी असे म्हणू शकते की, मी दक्षिण भारतीय शाकाहारी पदार्थ उत्तम प्रकारे बनवते.” मीनाक्षी लग्नानंतर फिल्म इंडस्ट्रीपासून खूपच लांब गेलेली आहे.

2) एके हंगल :- या यादीत एके हंगल यांच्या नावाचाही समावेश आहे. या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत बराच काळ घालवला. परंतु त्याच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा या अभिनेत्यासाठी खूप संघर्षमय होता. आर्थिक विवंचनेमुळे अशी वेळ आली होती की, त्याच्याकडे उपचार करण्यासाठीही पैसे नव्हते.

3) मंदाकिनी :- 1993 च्या मुंबई साखळी बॉ’म्बस्फोटाचा सूत्रधार दा’ऊद इ’ब्राहिमसोबत अभिनेत्री मंदाकिनीचे काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यानंतर खळबळ उडाली होती. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर मंदाकिनीला इंडस्ट्रीत काम मिळणे बंद झाले आणि ती विस्मृतीत गेली.

4) अनु अग्रवाल :- 1990 मध्ये आलेल्या ‘आशिकी’ चित्रपटातून अनु अग्रवाल मोठी स्टार बनली. पण अवघ्या 6 वर्षात अनु अग्रवालने चित्रपटांना टाटा-बाय-बाय म्हटले आणि अध्यात्माकडे पाऊल वळवले. एके काळी इंडस्ट्रीतील टॉप मोस्ट अभिनेत्री असलेल्या अनु अग्रवालचे आयुष्य 1999 मध्ये अपघात झाला तेव्हा पूर्णपणे उलटले होते, या रोड अपघातानंतर अनुचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. आज अनु अनामिक जीवन जगत आहे.

5) परवीन बाबी :- 70 च्या दशकातील सुपरस्टार परवीन बाबीने तिच्या करिअरमध्ये मोठे स्थान मिळवले होते. पण 1983 मध्ये ती बॉलिवूडपासून पूर्णपणे वेगळी झाली. विस्मृतीचे जीवन जगत असताना 2005 मध्ये परवीन तिच्या फ्लॅटमध्ये मृ’तावस्थेत आढळून आली होती.

6) ललिता पवार :- अभिनेत्री ललिता पवार हिने देखील आपल्या अभिनयाने घराघरात नाव कमावले होते. पण आयुष्याच्या शेवटी तीही पूर्णपणे एकटी झाली होती. ललिता पवार यांना क’र्करोगाचे निदान झाले, त्यानंतर त्या उपचारासाठी विस्मृतीत गेल्या.

7) जुगल हंसराज :- शाहरुख खानसोबत ‘मोहब्बतें’ सारख्या चित्रपटात दिसलेला अभिनेता जुगल हंसराजही आज विस्मृतीत आयुष्य जगत आहे. आता कलाकाराने चित्रपटसृष्टीपासून स्वतःला दूर ठेवले आहे.

8) राज किरण :- ‘कर्ज’ आणि ‘तेरी मेहराबियां’ सारख्या चित्रपटात काम केलेला अभिनेता राज किरण आज बॉलिवूडमधून पूर्णपणे गायब आहे. 2011 मध्ये, जेव्हा ऋषी कपूर राज किरणचा भाऊ गोविंद मेहतानी यांना भेटले तेव्हा असे उघड झाले की, राज किरणला 10 वर्षे अमेरिकेतील अटलांटा येथे मानसिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राज किरणची पत्नी आणि मुलाने त्याची फसवणूक केली होती, ज्यामुळे त्याने मानसिक संतुलन गमावले होते.

9) नकुल कपूर :- ‘तुमसे अच्छा कौन है’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता नकुल कपूर एकेकाळी मुलींमध्ये खूप लोकप्रिय होता. पण आता नुकल लाइमलाइट पासून खूप दूर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा पत्ता देखील लागत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.