.
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा ही फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे जिने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले. रेखाने वयाच्या 13 व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि 50 वर्षांच्या कारकिर्दीत तिने सुमारे 190 चित्रपटांमध्ये काम केले.
रेखाने वयाच्या १५ व्या वर्षी करिअरमधील पहिला किसिंग सीन दिला होता. रेखाचा हा किसिंग सीन १९६९ साली प्रदर्शित झालेल्या अंजना सफर या चित्रपटासाठी शूट करण्यात आला होता आणि रेखाला या दृश्याची माहितीही नव्हती. यासेर उस्मान यांनी लिहिलेल्या रेखा: द अनटोल्ड स्टोरीमध्ये रेखाने या किसिंग सीनची माहिती दिली आहे.
या पुस्तकात अंजाना सफर या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, ज्यामध्ये विश्वजित चॅटर्जी तीचे सहकलाकार होते, असे सांगण्यात आले होते. एके दिवशी रेखा चित्रपटाच्या एका गाण्याच्या शूटिंगसाठी सेटवर आली आणि दिग्दर्शकाने अॅक्शन बोलाताच विश्वजीतने रेखाला जबरदस्तीने चुंबन घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे रेखाला धक्काच बसला.
तीला या किसिंग सीनची माहिती देखील देण्यात आली नव्हती. विश्वजीत रेखाला किस करत राहिला तेव्हा, ना डायरेक्टर कट म्हणाला ना विश्वजीत थांबला. तो रेखाला सलग १५ मिनिटे किस करत राहिला. तेथे उपस्थित युनिट सदस्य शिट्ट्या वाजवत त्यांचा जयजयकार करत राहिले. यावेळी रेखा डोळे मिटून रडत होती.
तिच्यासोबत घडलेल्या या घटनेने रेखा हादरली आणि ती खूप घाबरली होती. तिला याविरुद्ध बोलायचे होते, पण १५ वर्षांची मुलगी काय करणार? रेखासोबतच्या सीनबद्दल बोलताना विश्वजीत म्हणाले की, रेखाच्या संमतीशिवाय हा सीन घडला. मात्र, त्याचा बचाव करताना त्याने सांगितले की, दिग्दर्शकाने तसे करण्यास सांगितले होते. यामुळे रेखा खूप दुखावली असल्याचेही त्यांनी सांगितले.