.
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rushabh Pant car accident)) याचा आज कार अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंत दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घरी जात असताना त्याच्या कारला अपघात झाला.
पंतवर सध्या डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान, आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील एक पोस्ट शेअर केली आहे.
उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत हे दोघेही नेहमीच अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघांमधील वादाची माहिती दोघांमधील इन्स्टा युद्धातून सर्वांना आली असेलच. ऋषभ पंतच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उर्वशी रौतेलाने एक पोस्ट शेअर केली आहे.
नुकतीच तीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्वशी रौतेलाने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. तिने कॅप्शन दिले, ‘प्रार्थना करत आहे.’ तिने व्हाइट हार्ट इमोजी देखील पोस्ट केला.
यावर तीच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘भाईचा अपघात झाला आहे आणि ती इथे हॉट म्हणून फिरत आहे.’ या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. जीव वाचवण्यासाठी त्याने गाडीचे विंड शील्ड तोडले.
स्थानिकांनी त्याला कारमधून बाहेर काढण्यास मदत केली आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले. 108 आणि हरिद्वार पोलीस घटनास्थळी पोहोचले.