ईशा अंबानी जुळ्या मुलांना घेऊन अमेरिकेतून थेट पोहचली भारतात, अंबानी कुटुंब मुलांच्या नावाने दान करणार 300 किलो सोनं…! पहा व्हिडीओ…

बॉलिवूड

.

ईशा अंबानीने कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये कृष्णा आणि आदिया या जुळ्या मुलांना जन्म दिला. आई झाल्यानंतर ईशा आज पहिल्यांदाच आई वडिलांच्या घरी येत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आजचा दिवस खूप खास आहे. मुकेश अंबानी प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज आपल्या नातवंडांना भेटले आहेत.

ईशा अंबानी आज आपल्या जुळ्या मुलांसह भारतात आली आहे. ईशा आणि तिच्या मुलांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये ईशा अंबानीने लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील सेडर सेनाई येथे कृष्णा आणि आदिया या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.

मुलांना जन्म दिल्यानंतर ईशा पहिल्यांदाच भारतात येत आहे. अशा स्थितीत अंबानी परिवार चांगलाच उत्साहात आहे. आज त्यांच्या स्वागतासाठी भव्य पूजेचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी विविध मंदिरातील पंडितांना पाचारण करण्यात आले आहे.

300 किलो सोने होणार दान :- वृत्तानुसार, अंबानी कुटुंबही मुलांच्या नावाने 300 किलो सोने दान करणार आहे. या दिमाखदार सोहळ्याचा फूड मेनूही खूप खास आहे. हे पदार्थ बनवण्यासाठी बड्या केटरर्सना पाचारण करण्यात आले आहे.

यासोबतच, तिरुपती बालाजी, तिरुमला, श्रीनाथजी, नाथद्वारा आणि श्री द्वारकाधीश आणि इतर ठिकाणांसारख्या भारतातील मोठ्या मंदिरांचा खास प्रसाद अंबानी कुटुंबियांच्या घरातील भव्य सोहळ्यात दिला जाईल. ईशाला घेण्यासाठी मुंबईतील डॉक्टरांची टीमही लॉस एंजेलिसमध्ये पोहोचली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.