.
80 च्या दशकात ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाने मंदाकिनी रातोरात प्रसिद्ध झाली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला होता आणि त्यावेळी या अभिनेत्रीच्या बोल्ड सीन्सचीही खूपच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. मंदाकिनीने या चित्रपटात इतके हॉट सीन्स दिले होते की, त्यावेळी या सीनमुळे बराच गदारोळ झाला होता.
पण बऱ्याच वर्षांनी मंदाकिनीने आता पुन्हा म्युजीक सॉंग द्वारे पुनरागमन केले आहे. या गाण्याच्या माध्यमातून अभिनेत्री मंदाकिनी पुन्हा इंडस्ट्रीत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. पण अभिनेत्रीने तिच्या धबधब्याखाली आंघोळीच्या सीनबाबत असे काही सांगितले की, तिचे हे विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बो’ल्ड सीन्स बद्दल केला मोठा खुलासा :- मंदाकिनीने नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खळबळजनक खुलासा केला आहे. यादरम्यान, जेव्हा अभिनेत्रीला आजकाल चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणार्या बोल्ड सीन्सबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली- ‘जेव्हा मी माझ्या पहिल्या चित्रपटात बोल्ड सीन केले होते, तेव्हा लोकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला होता.
त्या तुलनेत आजकाल त्याहून अधिक धाडसी सीन बघायला मिळत आहेत. आता तेच लोक याला कला म्हणतात. त्यावेळी लोक म्हणत होते की राज कपूर हे सर्व मुद्दाम करतो. त्याचा हेवा करणारे हे लोकही मोठ्या प्रमाणात होते. राज कपूरचे यश या लोकांना देखवत नव्हते.
माझी केली होती बदनामी :- यासोबतच मंदाकिनी म्हणाली की, ‘मुलाच्या ब्रे’स्ट फीडिंगच्या सीनबद्दल काय काय बोलले गेले होते. खरतर ब्रेस्ट फीडिंग ची प्रक्रिया ही प्रोजेक्ट प्रमाणे झाली होती. मी आता प्रॅक्टिकली दाखवली तर तुम्हाला सहज समजेल. त्यावेळी जी बदनामी व्हायला हवी होती ती तर झालीच आहे. लोकांना माझ्याबद्दल काय विचार करायचा होता तो त्यांनी केला.
धबधब्या खाली आंघोळीचा सीन झाल्यावर केली ही अशी हाल :- पुढे बोलताना मंदाकिनी म्हणाली- ‘मी धबधब्याखाली आंघोळ करण्याचा सीन दिल्यानंतर इंडस्ट्रीला एक टॅग मिळाला होता. त्यावेळी प्रत्येकाला आपल्या चित्रपटात माझ्याकडून आंघोळीचे सीन दाखवायचे होते. अनेक चित्रपट निर्मातेसुद्धा जबरदस्तीने आंघोळीची दृश्ये चित्रपटात टाकत होते. पण त्याचे नीट चित्रीकरण कोणालाच करता आले नाही.
View this post on Instagram
जेव्हा मी तो सीन केला तेव्हा तो माझा पहिला चित्रपट होता. राज कपूरसोबत काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्याच्या चित्रपटात असा सीन करताना मला अस्वस्थ वाटले नाही. पण असे काही नाही की माझा प्रत्येक चित्रपट निर्मात्याबद्दल एकसारखाच विश्वास असेल. यानंतर बरेच निर्माते आले आणि मला त्याच प्रकारचे सीन करण्यास सांगू लागले व माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा वाढू लागल्या.