.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील झाले आहेत. आलियाने 6 नोव्हेंबर 2022 रोजी एका मुलीला जन्म दिला. मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात आलियाने लहान परीला जन्म दिला आहे. बॉलीवूड स्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.
त्यादरम्यानच दोन दिवसानंतर अजून एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका ‘साथ निभाना साथिया’ची अभिनेत्री रुचा हसबनीस हिने मुलाला जन्म दिला आहे. रुचा दुस-यांदा आई झाली आहे, रुचाने ही खुशखबर इंस्टा पोस्टद्वारे दिली आहे. रुचाने नवजात बाळाच्या पायाचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे.
मुलाच्या समोर एक बोर्ड आहे ज्यामध्ये लिहिले आहे – तू जादू आहेस. कॅप्शनमध्ये रुचाने लिहिले – रुहीची साइड किक आली आहे. आणि हा मुलगा आहे. रुचाने ही आनंदाची बातमी शेअर करताच तारे-तारकांनी तिचे अभिनंदन करायला सुरुवात केली. रुचाने मुलाचा चेहरा दाखवला नाही. चाहत्यांनी रुचाला त्यांच्या छोट्या स्टारचा चेहरा दाखवण्याचे आवाहन केले आहे.
रुचा स्टार प्लसच्या साथ निभाना साथिया या मालिकेत दिसली होती. या शोमध्ये तीने राशीची भूमिका साकारली होती. रुचा या शोमध्ये ग्रे कॅरेक्टर होती. रुचा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, पण नंतर तिने लग्न केले आणि अभिनय करिअर सोडले. रुचाने 2015 मध्ये बिझनेसमन राहुल जगदाळेशी लग्न केले.
2019 मध्ये या जोडप्याच्या घरी एक छोटी देवदूत आली. तीच्या मुलीचे नाव रुही आहे. रुचा तिच्या घरच्यांमध्ये व्यस्त आहे. रुचा हसबनीस स्पॉटलाइटपासून दूर राहते. मात्र रुचा सोशल मीडियावर पूर्णपणे सक्रिय असते. रुचा तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
तिच्या फोटोंशिवाय रुचा हसबनीस अनेकदा तिच्या मुलीचे गोंडस फोटो शेअर करत असते. रुचा हसबनीसची मातृत्वाची फॅशन चर्चेत होती. रुचा बेबी बंप दाखवतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. रुचा हसबनीस शोबिझ इंडस्ट्रीपासून दूर आहे, पण तिचा म्युझिक व्हिडिओ 2020 मध्ये आला होता. ज्यामध्ये रुचाने छोटी भूमिका साकारली होती.