.
ते म्हणतात ना की कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र असतो. ते फक्त कुत्रे नाहीत, तर ते आपल्या कुटुंबातील एक सदस्य असतात. आणि पाळीव प्राण्यांपैकी कुत्रा असा आहेत की तो नेहमीच मालकाच्या चांगल्या आणि वाईट वेळी सोबतच असतो. ही कथा अगदी खरी असल्याचे सिद्ध करते!
या वेळी पेरूच्या चिंबोटे येथील ही मन हेलवणारी घटना समोर आली आहेत. मालकाला इमर्जन्सी हॉस्पिटल मध्ये दाखल करणे गरजेचे असल्याने हॉस्पिटल ची अंबुलन्स क्षणात मालकाच्या घरी येऊन त्या व्यक्तीला जेव्हा अंबुलन्स मध्ये ठेवण्याची वेळ येते तेव्हा हा पाळीव कुत्रा देखील एखाद्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे मालकाच्या सोबतच अंबुलन्स मध्ये उडी मारून बसला.
इतर लोकांनी कुत्र्याला अंबुलन्स मध्ये येण्यास नकार दिला असतानाही कुत्रा काही हार मानण्यास तयार नव्हता. अंबुलन्स मध्ये उडी मारून बसल्या नंतर त्या कुत्र्याने आपला मालक ठीक असल्याची खात्री करण्यासाठी तो त्याच्याकडे एकटक पाहत राहिला.
अंबुलन्स मालकाला घेऊन हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर, कुत्र्यांने अंबुलन्स मधून खाली उडी मारली आणि मालका सोबत धावू लागला आणि त्याच्या मालकाच्या मागे हॉस्पिटल मध्ये गेला. त्यावेळी तो कुत्रा प्रेमाने त्याच्या मालकाला चाटु लागला.
त्या माणसाने त्याच्या कुत्र्याची चांगली काळजी घेतली होती म्हणून आता तो कुत्रा वाईट काळात मालकाची काळजी घेत असताना दिसून आले. कुत्रा अतिशय चिंतेत दिसत होता. आणि त्याने हे स्पष्ट केले की तो त्याच्या मालकावर बिनशर्त प्रेम करत आहे.
या माणसाने आपल्या कुत्र्याची खूप चांगली देखभाल केली म्हणूनच आता तो कुत्रा मालक लवकर बरा होण्यासाठी चिंतित झाला आहे. हॉस्पिटल मध्ये देखील तो कुत्रा मालकाच्या शेजारीच बसून असल्याचे दिसून आले. आशा आहे की कुत्र्याचा मालक त्वरीत बरा होईल जेणेकरुन तो त्याच्या प्रिय पाळीव कुत्र्यासोबत पुन्हा एकत्र येऊ शकेल.