.
मनोरंजन विश्वातील कलाकारांना पाहून आपणही त्यांच्यासारखे सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं असतं. प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याविषयी आवड निर्माण झालेली असते. पण खरंच हे कलाकार इतके सुंदर दिसतात कि नाही यावर शंका निर्माण केली जाते. तुम्ही देखील तुम्हाला आवडणार्या अभिनेत्रीबद्दल सोशल मीडियाद्वारे अनेकदा जाणून घेतले असेलच.
अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ‘आश्रम’ वेब सिरीजमधील या बोल्ड अभिनेत्रीचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का? चला तर मग पाहूयात ही इतकी बोल्ड अभिनेत्री आहे तरी कोण. बर्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकून देखील ‘आश्रम’ या वेब सिरिजचे तीन सीझन धमाकेदार झाले. तीन सीझनच्या जबरदस्त हिटनंतर या सिरिजच्या चौथ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
मालिकेच्या कथेसोबतच या मालिकेतील पात्र देखील लोकांना खूप आवडले आहे. या मालिकेतील बबीताचे पात्र साकारणारी अभिनेत्री त्रिधा चौधरी सध्या चर्चेत आली आहे. त्रिधा ही तिच्या बो’ल्ड आउटफिटमुळे नेहमीच चर्चेत राहिली आणि त्यातूनच तिने फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपले एक भक्कम स्थान निर्माण केले आहे. जे तिच्याकडून कधीच कोणी हिरावू शकत नाही.
तर अशा या बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफुल अभिनेत्रीचा नुकताच एक भन्नाट लुक मधील व्हिडीओ चाहत्यांच्या समोर आला आहे. ज्यात ती सोशल मीडियावर अक्षरश: कहर माजवताना दिसत आहे. खूप काळ लाईमलाईटपासून दूर असलेली अभिनेत्री त्रिधाने आपल्या एकाच लुकने अवघ्या इंडस्ट्रीची लाईमलाईट हिरावून घेतली आहे.
त्रिधाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्री त्रिधाचे फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे. त्रिधाचे चाहते नेहमीच तिच्या नव्या लूकची वाट पाहत असतात. त्याचवेळी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री त्रिधा देखील सोशल मीडियावर सक्रिय असते आणि सतत पोस्ट शेअर करत असते.
त्रिधा सध्या सुपरहिट वेब सीरिज ‘आश्रम’च्या चौथ्या सीझनमुळे चर्चेत आहे. चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर यावेळी त्रिधा खूपच दमदार स्टाईलमध्ये दिसणार आहे. ‘आश्रम’ या सुपरहिट वेब सीरिजमध्ये बबिताची भूमिका साकारून अभिनेत्री त्रिधा चौधरी रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
यानंतर तिला अशी ओळख मिळाली की तिच्या प्रत्येक प्रोजेक्टमुळे त्रिधा चर्चेत येऊ लागली आहे. अभिनेत्री त्रिधा चौधरीने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये ती ब्रिजच्या आत पाण्यात पाय सोडून बसलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री त्रिधा तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आम्हाला फक्त एकच औषध हवे आहे. व्हिडिओमध्ये एक आवाज ऐकू येत आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, पहा औषधाचा अर्थ कधी कधी गोळी नसतो, कधी कधी फक्त आणि फक्त मोकळ्या हवेत श्वास घेणे देखील औषधासारखे कार्य करते.
दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेबसीरिजमधून त्रिधा चौधरी प्रकाश झोतात आली. बंगाली , तेलगू चित्रपटात सृष्टीतील एक नावाजलेला चेहरा म्हणून अभिनेत्री त्रिधाकडे पाहिले जाते. बंगाली, तेलगु चित्रपटांच्या बरोबरीने त्रिधाने मालिका तसेच ‘स्पॉटलाइट’, ‘बंदिश बँडिट्स’ या वेबसीरिजमध्ये काम करून प्रसिद्ध मिळवली. तर 2013 साली त्रिधाने बंगाल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.