। नमस्कार ।
सध्या टेलिव्हिजनवर छोट्या पडद्यावर चालू असलेल्या ‘आई कुठे काय करते’ हा कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमाचा विषय, डायलॉग, उत्तम दिग्दर्शन आणि या सर्वांना न्याय देणारा सर्व कलाकारांचा कसदार अभिनय यामुळेच या कार्यक्रमाने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे.
सध्या कार्यक्रमात भूमिका करत असलेले यश आणि गौरीच्या साखरपुड्याचा भाग पाहायला मिळतो आहे. मात्र ऐन साखरपुड्याच्या दिवशी गौरीने आपण कधीच आई होऊ शकत नाही हे सत्य सर्वांना सांगितलं आणि आईपणाची ही बाब पुन्हा एकदा चर्चेत आली.
आई होणं एवढ्यातच स्त्री चं स्त्रीत्व आहे का ? या विषयावर स्त्री ला न्याय मिळवून देणारा हा प्रसंग या कार्यक्रमात सलग तीन दिवस चालला. ३१ पानांची संहिता असलेला हा प्रसंग सर्वच्या सर्व कलाकारांनी जिवापलीकडे अभिनय सादर केला. त्यामुळेच या खास भागाचं सर्वांकडून कौतुक होत आहे.
‘आई कुठे काय करते’ कार्यक्रमामधील या खास भागा विषयी सांगताना अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर म्हणतात की , ‘एकाच लोकेशनवर , एकाच विषयावर तीन भाग फक्त एकाच विषयावर चर्चा चालू ठेवणं हे टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल असावं. तरीही प्रेक्षकांनी हे तिन्ही भाग समरस होऊन पाहिले हे खूप महत्वाची बाब आहे. आई ह्या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी घेऊन केलेल्या मालिकेमध्ये आई होणं ह्या विषयावर गेले ३ एपिसोड सर्व बाजूंनी चर्चा चालू आहे.’
पुढे त्या म्हणाल्या, ‘वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्याच्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या कोनातून इतकी सारासार चर्चा. या संपूर्ण सीनचे वाचनच ४१ मिनिटांचे होते. ते संपूर्ण ३ एपिसोड फक्त हीच चर्चा चालू होती आणि प्रेक्षकांचा प्रचंड सुंदर प्रतिसाद मिळत आहे.
याचं संपूर्ण श्रेय आमची लेखिका मधुराणी गोडबोले, पटकथा लेखिका नमिता वर्तक, दिग्दर्शक रवींद्र करमरकर आणि संपूर्ण ‘आई कुठे काय करते’च्या टेक्निकल टीम आणि या कार्यक्रमात सर्वांच्या व्यक्तिरेखा उमटवणार्या कलाकारांचं आहे. या टीमवर संपूर्ण विश्वास ठेवणारे आमचे निर्माते राजन शाही आणि स्टार प्रवाहच्या संपूर्ण टीमचं आहे.
आजवर मालिकेला मिळालेलं प्रेम अभूतपूर्व आहे हे प्रेम असंच वाढत राहो हीच अपेक्षा.’ त्यासाठी न चुकता पाहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर.
बघा विडिओ :-