.
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने अचानक लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद झिरार अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. ज्याची माहिती तिने आपल्या इंस्टाग्रामवर अधिकृतपणे दिली आहे. अभिनेत्रीच्या समोर आलेल्या फोटोंमध्ये ती लाल रंगाची साडी नेसलेली अतिशय सुंदर दिसत आहे.
स्वराने तिच्या प्रेमकथेच्या प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्वरा भास्कर अनेकदा तिच्या राजकीय विचारांमुळे चर्चेत असते. पण आता तिच्या आयुष्यात ‘राजकीय एन्ट्री’ झाली आहे. स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
स्वराने याच वर्षाच्या सुरुवातीला 6 जानेवारीलाच लग्नाची नोंदणी केली होती. आता या दोघांचा विवाहसोहळा पुढील महिन्यात दिल्लीत पार पडणार आहे. काही काळापूर्वी स्वराने स्वतःचा आणि फहादचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण या फोटोत दोघांचेही चेहरे दिसत नव्हते. पण आता स्वराने तिच्या नात्याची घोषणा केली आहे.
स्वरा भास्करचा पती फहाद अहमद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा प्रदेशाध्यक्ष आहे. स्वरा भास्करने काही काळापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिची आणि फहादची संपूर्ण प्रेमकथा सांगताना दिसत आहे. दोघांनी 6 जानेवारीला स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्नाची नोंदणी केली होती. व्हिडिओच्या एका फोटोमध्ये स्वराही रडताना दिसत आहे.
एक व्हिडिओ शेअर करत स्वरा भास्करने लिहिले की, “कधीकधी तुम्ही ते संपूर्ण जगात शोधता, जे तुमच्या शेजारी असते. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री सापडली आणि नंतर आम्ही एकमेकांना शोधले. फहाद अहमद तुझे मनापासून स्वागत आहे. इथे खूप गोंगाट आहे, पण तो तुझा आहे.” पुढील महिन्यात हे जोडपे रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. फहाद स्वरापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे.
म्हणजेच जानेवारीमध्ये स्वराने आपला ‘मिस्ट्री मॅन’ बनवून ज्याची ओळख जगाला करून दिली. तो दुसरा कोणी नसून स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद आहे. याआधी स्वरा भास्कर आणि लेखक हिमांशू शर्मा डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, 2019 मध्ये या दोघांच्या ब्रेकअपची चर्चाही समोर आली होती. अभिनेत्री शेवटची ‘जहां चार यार’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 16 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला.